गुप्त भेटीत मुख्यमंत्री-गडकरींची मनपा निवडणुकांबाबत चर्चा
By Admin | Updated: January 6, 2017 13:08 IST2017-01-06T13:08:21+5:302017-01-06T13:08:21+5:30
महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी चालवली असून त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस आणि गडकरींची भेट झाली.

गुप्त भेटीत मुख्यमंत्री-गडकरींची मनपा निवडणुकांबाबत चर्चा
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ६ - महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी चालवली असून त्याच पार्श्वभूमीवर शहरातील सर्व आमदार, महापौर यांच्यासह दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी बैठक झाली. सकाळी सुमारे अर्धा तास ही बैठक सुरू होती.
यावेळी बैठकीला भाजप शहरध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, मध्य नागपूर आमदार विकास कुंभारे आणि पश्चिम नागपूर आमदार सुधाकर देशमुख तसेच महापौर प्रवीण दटके उपस्थित होते. बैठकीनंतर एकाच गाडीतून गडकरी, फडणवीस आणि महापौर पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. मनपा निवडणुकीतील रणनीती बाबत या बैठकीत चर्चा झाली