आदिवासी पाहुणचाराने मुख्यमंत्री भारावले

By Admin | Updated: May 17, 2017 18:25 IST2017-05-17T18:25:39+5:302017-05-17T18:25:39+5:30

सातपुडय़ातील अतिदुर्गम भागात बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासींशी संवाद साधून त्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला.

The Chief Minister filled the tribal hospice | आदिवासी पाहुणचाराने मुख्यमंत्री भारावले

आदिवासी पाहुणचाराने मुख्यमंत्री भारावले

ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. 17 - सातपुडय़ातील अतिदुर्गम भागात बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासींशी संवाद साधून त्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. सोबतच आदिवासी बांधवांचा पाहुणचार, स्वागत व खास आदिवासींच्या पारंपारिक आहारातील स्वादीष्ट जेवण घेवून अक्षरश: मुख्यमंत्री भारावले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी सातपुडय़ातील मोलगी व भगदरी या परिसरात आले होते. त्यांच्याहस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन, भूमिपूजन होऊन त्यांनी विविध कामांची पाहणीही केली. या वेळी भगदरी, ता.अक्कलकुवा येथे त्यांनी अमृत पाडवी यांच्या पारंपारिक झोपडीच्या घरात बसून तेथे त्यांच्या कुटुंबीयांची आस्थेने चौकशी केली. शिवाय आदिवासींच्या पारंपारिक बिगर दुधाचा चहादेखील घेतला. या वेळी माजी आमदार डॉ.नरेंद्र पाडवी व आशा पाडवी यांनी त्यांचे पारंपारिक शिबली टोपली व धनुष्यबाण भेट देवून स्वागत केले. याच वेळी त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी आलेल्या आदिवासी पारंपारिक नृत्य पथकातील कलाकारांजवळ जावून त्यांची विचारपूस केली. उपस्थितांनी परिधान केलेल्या तुंबडी, टोप याबाबत माहिती घेतली.
या नियोजित दौ:यात त्यांच्या भोजनाची व्यवस्था मोलगी येथील राजीव गांधी भवनात करण्यात आली होती. मात्र अधिका:यांची बैठक संपल्यानंतर त्यांनी तेथे भोजन न घेता खास आदिवासी कुटुंबांकडे बनविलेल्या पारंपारिक भोजनाचा डबा सोबत घेतला. त्यात मेथी, पालक तसेच वांग्याचे भरित, हिरवी मिरची तसेच लाल मिरचीचा ठेसा, कैरीची चटणी, वरण-भात आणि मका तसेच दादरच्या भाकरीचा समावेश होता. माजी आमदार नरेंद्र पाडवी व पिरसिंग पाडवी यांनी हा डबा त्यांना दिला.

Web Title: The Chief Minister filled the tribal hospice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.