मुख्यमंत्री फडणवीस आज यवतमाळात

By Admin | Updated: November 25, 2014 02:28 IST2014-11-25T02:28:58+5:302014-11-25T02:28:58+5:30

लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवार, 25 नोव्हेंबर रोजी यवतमाळात येत आहेत.

Chief Minister Fadnavis today in Yavatmal | मुख्यमंत्री फडणवीस आज यवतमाळात

मुख्यमंत्री फडणवीस आज यवतमाळात

जवाहरलाल दर्डा स्मृती समारोह  : प्रेरणास्थळावर आदरांजली 
यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवार, 25 नोव्हेंबर रोजी यवतमाळात येत आहेत. येथील प्रेरणास्थळावर आयोजित आदरांजली कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. 
बाबूजींच्या 17व्या स्मृती समारोहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रेरणास्थळावर संगीतमय श्रद्धांजली सभेत  यवतमाळातील प्रथितयश गायक आणि वाद्यवृंद बाबूजींना संगीतमय श्रद्धांजली अर्पण करतील. (प्रतिनिधी)

 

Web Title: Chief Minister Fadnavis today in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.