मुख्यमंत्री फडणवीस आज अलिबागमध्ये
By Admin | Updated: June 6, 2015 22:40 IST2015-06-06T22:40:05+5:302015-06-06T22:40:05+5:30
महाराष्ट्र राज्य क्र ीडा व युवक सेवा संचालनालयाच्या माध्यमातून अलिबाग तालुक्यातील नेहुली येथे उभारण्यात आलेल्या रायगड जिल्हा क्रीडा संकुलाचे लोकार्पण

मुख्यमंत्री फडणवीस आज अलिबागमध्ये
अलिबाग : महाराष्ट्र राज्य क्र ीडा व युवक सेवा संचालनालयाच्या माध्यमातून अलिबाग तालुक्यातील नेहुली येथे उभारण्यात आलेल्या रायगड जिल्हा क्रीडा संकुलाचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवार ७ जून रोजी सकाळी ९.३० वाजता करण्यात येणार आहे.
लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने रायगड जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित या विशेष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायगडचे पालकमंत्री तथा राज्याचे गृहनिर्माण, खनिकर्म व कामगार मंत्री प्रकाश मेहता हे राहणार असून, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते, शालेय शिक्षण, क्र ीडा आणि युवक कल्याण मंत्री विनोद तावडे हे उपस्थित राहणार आहेत.
सुमारे दहा एकर क्षेत्रात २००३ मध्ये हे क्रीडा संकुल उभारणीस सुरुवात करण्यात आली असून त्यासाठी सुमारे दहा कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. क्रीडा संकुलात पहिल्या टप्प्यात इन्डोअर हॉल, खुले प्रेक्षागृह, वसतिगृह, मल्टीजीमची उभारणी करण्यात आली आहे.