मुख्यमंत्री फडणवीसांनी पत्नीच्या बँकेसाठी केली वशिलेबाजी - दिग्विजय सिंह

By Admin | Updated: March 19, 2016 14:45 IST2016-03-19T14:23:45+5:302016-03-19T14:45:45+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली पत्नी उपाध्यक्ष असलेल्या बँकेला फायदा व्हावी म्हणून वशीलेबाजी केल्याचा आरोप काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी केला आहे

Chief Minister Fadnavis made vicious move for wife's bank - Digvijay Singh | मुख्यमंत्री फडणवीसांनी पत्नीच्या बँकेसाठी केली वशिलेबाजी - दिग्विजय सिंह

मुख्यमंत्री फडणवीसांनी पत्नीच्या बँकेसाठी केली वशिलेबाजी - दिग्विजय सिंह

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली पत्नी उपाध्यक्ष असलेल्या बँकेला फायदा व्हावी म्हणून वशीलेबाजी केल्याचा आरोप काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी केला आहे. फडणवीस हे एसआरए किंवा झोपडपट्टी पुनर्विकास योजनेचे प्रमुख आहेत. त्यांनी एसआरए विकासकांना वरळीच्या अॅक्सिस बँकेच्या शाखेत खाती उघडण्यास सांगितले आहे. हा वशिलेबाजीचा कळस झाला असं टि्वट दिग्विजयसिंहांनी केलं आहे.
दुसऱ्या टि्वटमध्ये असं करण्यामागचं कारण सांगताना सौभाग्यवती फडणवीस अॅक्सिस बँकेच्या उपाध्यक्षा आहेत याची आठवण करून दिली आहे.
दिग्विजय सिंहांच्या या आरोपांना मुख्यमंत्री उत्तर देतात की दुर्लक्ष करतात हे बघणं औत्सुक्याचं आहे.

Web Title: Chief Minister Fadnavis made vicious move for wife's bank - Digvijay Singh