शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली दौऱ्यासाठी रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 15:35 IST

Eknath Shinde : मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतील नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. गडचिरोलीत रेड अलर्ट देण्यात आला आहे. 

मुंबई : राज्यात सध्या सर्वदूर जोरदार पाऊस सुरु आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र तसेच मुंबई आणि उपनगरांतही पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. याचबरोबर, गडचिरोलीला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतील नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. पुढील २ दिवस गडचिरोलीत रेड अलर्ट देण्यात आला आहे. 

याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय करण्यात येत आहेत. येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ गडचिरोली दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. चार वाजता एकनाथ शिंदे हे अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी ६.३० वाजता पूर परिस्थितीबाबत गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन सोबत आढावा बैठक घेणार आहेत.  

दरम्यान, हवामान खात्याने १२ जुलैपर्यंत जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून पुढील तीन दिवस म्हणजेच बुधवारपर्यंत जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, खासगी कार्यालये, सर्व प्रकारची दुकाने व इतर व्यवसाय बंद ठेवण्यात येतील. अत्यावश्यक सेवा व शासकीय कार्यालये सुरू राहतील, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय मीना यांनी दिले आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. काही नदी-नाल्यांना पूर आला असून ठेंगण्या पुलांवरून पाणी वाहत आहे. अशा स्थितीत कामानिमित्त निघालेले नागरिक पुलावरून पाणी असताना रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे दुर्घटना घडू शकते. सोमवार ते बुधवारपर्यंत हवामान खात्याने गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे परिस्थती आणखी बिघडू शकते. 

३५३ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले-   नदीच्या काठी व सखल भागात वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी हलविले आहे. या कुटुंबांची व्यवस्था प्रामुख्याने जिल्हा परिषद शाळांमध्ये केली आहे. -    अहेरी तालुक्यातील सूर्यापल्ली येथील १६, गाेलाकर्जी ४०, तिमरम ४, माेदुमगडगू ४, निमलगुडम १२, रेगुलवाही १५, मरमपल्ली ४०, लिंगमपल्ली १२०, कमलापूर ३१, छल्लेवाडा ७१ जणांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. तसेच  सिराेंचा तालुक्यातील मद्दीकुंठा ३२ व सूर्यारावपल्ली येथील ४० नागरिक असे एकूण ३५३ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेGadchiroliगडचिरोलीfloodपूरRainपाऊस