शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

हाेय, आम्ही महाविकास आघाडीत होतो, मात्र...; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 08:55 IST

ठाकरे सरकारमध्ये आम्ही दोघेही होतो; परंतु आम्ही मुख्यमंत्री नव्हतो. आम्ही योजना घेऊन जायचो, त्यावर निर्णयच होत नव्हता.

छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्ही दोघेही मंत्री होतो; परंतु माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे योजनेचा प्रस्ताव घेऊन गेल्यावर ते निर्णयच घेत नव्हते, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी सुभेदारी विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलताना केली.

मुख्यमंत्री म्हणाले, विरोधी पक्षाला एकच सांगायचे की, त्यांनी अडीच वर्षांत घोषणाही केल्या नाहीत. प्रकल्पांसाठी निधी मिळणारच आहे. जे कधी मंत्रालयात गेले नाहीत, ते काय घोषणा करणार. ठाकरे सरकारमध्ये आम्ही दोघेही होतो; परंतु आम्ही मुख्यमंत्री नव्हतो. आम्ही योजना घेऊन जायचो, त्यावर निर्णयच होत नव्हता. त्याचा अनुभव अजित पवारांनाही आहे. इच्छाशक्ती असलेला मुख्यमंत्री पाहिजे. आम्ही सरकार पलटवले नसते तर राज्य आणखी मागे गेले असते, आता राज्य पहिल्या क्रमांकावर आले आहे. जेव्हा जायचे होते, शेतकऱ्यांच्या बांधावर तेव्हा गेले नाहीत. तेव्हा तर घराजवळदेखील कुणाला येऊ देत नव्हते. तेव्हा नीट राहिले असते तर हे दिवसदेखील आले नसते, अशी टीकाही शिंदे यांनी ठाकरेंवर केली. 

मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांचे मत असे...मनोज जरांगे यांना मुख्यमंत्र्यांनीच उपोषणाला बसविले, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. यावर मुख्यमंत्री म्हणाले, पटोले यांना राज्यात कुणीही गांभीर्याने घेत नाही. त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावे, आंदोलनामागे शिंदेंचा हात आहे का म्हणून, जरांगे यांनी माझ्या आवाहनाला मान दिला. मराठा आरक्षणासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. गृहमंत्र्यांवर केलेले आरोप खोटे असून, त्यांनी पोलिस लाठीमारप्रकरणी माफी मागितली आहे. कुणबी नोंद असेल तर मराठ्यांना आरक्षण देण्यास ओबीसींना आक्षेप नाही. सरसकट आरक्षण देण्यास ओबीसींचा विराेध आहे. त्यामुळे अशी कोणतीही भूमिका, राज्याची नाही. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही. जे सध्या आरोप करीत आहे, त्यांच्या नाकर्तेपणामुळे सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकले नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे