शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

"लाडक्या बहिणींची रक्कम वाढवू", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 12:54 IST

Ladki Bahin Yojana: तुम्ही सरकारची ताकद वाढविली तर आम्हीही हात आखडता घेणार नाही. फक्त दीड हजारांवर थांबणार नाही. हे दीड हजार पुढे दोन हजार, अडीच हजार, तीन हजार होतील. लाडक्या बहिणीला ओवाळणीची रक्कम वाढवत जाऊ, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

नागपूर - महायुती सरकारने लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला पैसे दिले, भाऊबीजेला पण दिले जातील. हा माहेरचा आहेर आहे. ही योजना बंद होणार नाही. तुम्ही सरकारची ताकद वाढविली तर आम्हीही हात आखडता घेणार नाही. फक्त दीड हजारांवर थांबणार नाही. हे दीड हजार पुढे दोन हजार, अडीच हजार, तीन हजार होतील. लाडक्या बहिणीला ओवाळणीची रक्कम वाढवत जाऊ, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधीचे वितरण शनिवारी रेशीमबाग मैदानावर आयोजित सोहळ्यात करण्यात आले. यावेळी मंचावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन, मंत्री धर्मरावबाबा आत्राम, मंत्री आदिती तटकरे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, या योजनेने सर्व रेकॉर्ड तोडल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. योजनेत खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना धडा शिकवा. ही योजना सरकार बंद होऊ देणार असा त्रिवार संकल्प त्यांनी व्यक्त केला.

नितीन गडकरी यांनी ही योजना महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने राज्यात नव्या युगाची सुरुवात असल्याचे सांगितले. नोव्हेंबरमध्ये निवडणुका आहेत. तुम्ही आशीर्वाद द्या. पुढे पाच वर्षे ही योजना व्यवस्थित चालविली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. तर, विरोधकांनी योजना बदनाम करण्यासाठी चुकीचे अर्ज भरले. त्यामुळे ५० हजारांवर अर्ज रद्द झाले. त्यांना नव्याने अर्ज भरण्याची संधी दिली जाईल, असे अदिती तटकरे

नागपुरातील रेशीमबाग मैदानावर आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्य्यातील निधी वितरणाचा शुभारंभ करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री आदिती तटकरे, धर्मरावबाबा आत्राम, गिरीश महाजन व चंद्रशेखर बावनकुळे. (छाया: मुकेश कुकडे)यांनी सांगितले.

'देवाभाऊ असेपर्यंत स्थगिती नाही'उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, योजना बंद व्हावी म्हणून काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हायकोर्टात गेले. हे तेच आहेत जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व आमदार विकास ठाकरे यांचे निवडणूक प्रमुख होते. माजी मंत्री सुनील केदार यांचे 'राइट हँड' म्हणून ओळखले जातात. त्यामुळे यांची नियत ओळखा. देवाभाऊ असेपर्यंत हायकोर्टात मोठा वकील उभा करू, काहीही झाले तरी योजनेला स्थगिती येऊ देणार नाही.

मुख्यमंत्री संघस्थानी, पवारांनी दर्शन टाळलेसायंकाळी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसराला भेट देत समाधीस्थळाचे दर्शन घेतले. सोबत उपमुख्यमंत्री फडणवीस हेदेखील होते. मात्र दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या परिसरात येऊनही दर्शन टाळले. त्यामुळे चर्चेला उधाण आले होते.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMahayutiमहायुतीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार