शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून त्यांच्या छातीत धडकी भरलीय; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 18:28 IST

आत्मविश्वास होता म्हणून ५० आमदारांसोबत १३ खासदार माझ्यासोबत आहेत.

मुंबई - महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही. बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार गेल्या ५ महिन्यापासून सुरू आहे. त्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. छातीत धडकी भरलीय. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार कुणाला आहे? ज्यांनी बाळासाहेबांचे हिंदुत्व मोडले त्यांना आमच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. सत्तेच्या खुर्चीसाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार मोडले. हिंदुत्व सोडले आणि तडजोड केली त्यांना शिकवण्याची आम्हाला आवश्यकता नाही असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही कामाख्या देवीला जाहीरपणे जाणार आहे. आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी हे सरकार स्थापन केले. आम्ही जे करतो ते उघडपणे करतोय. कुठल्याही मंदिरात जाण्यास अडथळा नाही. जे करतो ते निधड्या छातीनं करतो. माझ्यासोबत मंत्री होते. मीडिया होती त्यामुळे आम्ही जे करतो ते लपूनछपून करत नाही. उघड करतो. दिवसाढवळ्या करतो. काही लपून करतात. त्यामुळे आम्हाला शिकवू नका. आत्मविश्वास होता म्हणून ५० आमदारांसोबत १३ खासदार माझ्यासोबत आहेत. महाविकास आघाडी सरकार कुणासाठी काम करायचं? हे सर्वसामान्यांना मान्य नव्हते. म्हणून त्यांच्या मनातील सरकार स्थापन केले. ३० जूनला ज्यांना हात दाखवायचा त्यांना दाखवला आहे असा टोलाही त्यांनी लगावला. 

महाराष्ट्राची १ इंचही जागा जाऊ देणार नाही कर्नाटकच्या विषयावर मी आधीच भाष्य केले आहे. २०१२ चा विषय आहे. तेव्हा कुणाचे सरकार होते. गेल्या अडीच वर्षात सीमाप्रश्नावर काय केले? एकनाथ शिंदे सीमाप्रश्नावर आंदोलन करून ४० दिवस जेलमध्ये होतो. त्यामुळे आम्हाला सांगू नका. सीमावासियांना मिळणाऱ्या योजना मविआनं बंद केल्या. सीमावर्ती भागात मराठी माणसाला न्याय देण्याची भूमिका आम्ही घेतोय. महाराष्ट्राची एक इंचही जागा कुठेही जाऊ देणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. 

...म्हणून विरोधक राजकारण करतायेतछत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही. मागील ४ महिन्यापासून आमचं सरकार लोकहितासाठी काम करतंय. १०० पेक्षा जास्त निर्णय घेतलेत. त्यामुळे विरोधी पक्षाच्या पायाखालची वाळू सरकलीय. त्यामुळे ते राजकारण करतायेत असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे