शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

आणखी धक्के बसणार?; मुर्मू यांना २०० मते देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 06:56 IST

महाराष्ट्र पाठिशी भक्कमपणे उभा राहिल, असा विश्वास मुर्मू यांनी व्यक्त केला.

मुंबई : शिवसेनेतील ४० आमदारांसह बंड करत भाजपसोबत सरकार स्थापन करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना आमदारांची २०० मते देऊ, असे जाहीर केल्याने शिंदे आणखी कोणाला धक्का देणार याची चर्चा सुरू झाली आहे. 

मुर्मू यांनी गुरुवारी मुंबईत भाजप-शिंदे गटाच्या आमदारांच्या बैठकीत मार्गदर्शन केले. यावेळी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मुर्मू यांच्या पाठीशी महाराष्ट्र भक्कमपणे उभा असल्याची ग्वाही दिली. शिंदे सरकारने १६४ आमदारांच्या पाठिंब्याने विश्वासदर्शक ठराव जिंकला होता. तसेच विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर यांनाही तेवढीच मते मिळाली होती. आता मुर्मू यांना २०० मते मिळवून देऊ असे शिंदे यांनी जाहीरपणे सांगितले. 

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात १५ आमदार आहेत आणि त्यांनी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे, अशी १७९ मते होतात. याचा अर्थ आणखी २१ आमदारांची मते मुर्मू यांच्या पारड्यात टाकण्याची शिंदे-भाजपची रणनीती असल्याचे म्हटले जात आहे. येथे उपस्थित नसलेले अनेक जण मुर्मू यांना मतदान करतील, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. नितीन गडकरी यांनी मुर्मू यांना अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळतील, असा दावा केला. 

द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाच्या महिला आहेत. आदिवासी व्यक्तीला देशाच्या सर्वोच्चपदी बसविण्याचा जो निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. मुर्मू यांना मोठा प्रतिसाद मिळत असून, त्यांच्या विजयाची औपचारिकता बाकी आहे. महाराष्ट्रातून त्यांना रेकॉर्डब्रेक मते मिळतील, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी नंतर माध्यमांना सांगितले. यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, डॉ. भारती पवार, भाजपचे सरचिटणीस सी. टी. रवि आदी उपस्थित होते. 

महाराष्ट्र पाठीशी राहील हा माझा विश्वास : मुर्मू महाराष्ट्राच्या पवित्र भूमीला माझा नमस्कार, अशी मुर्मू यांनी मराठीतून सुरुवात केली. महाराष्ट्र माझ्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील, असा मला विश्वास आहे. पंचायतीपासून लोकप्रतिनिधी म्हणून सुरू झालेल्या प्रवासात मी निडरपणे काम केले. कायद्याची चौकट मोडली नाही. कुणाला घाबरलेदेखील नाही. सामान्य माणसाला न्याय मिळेल अशीच भूमिका घेतली आहे. राष्ट्रपती पदाची संवैधानिक जबाबदारी पार पाडताना माझ्याकडून आपली निराशा कधीही होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. 

  • मुर्मू यांच्या उपस्थितीत पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीचे आमंत्रण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वा त्यांचे समर्थक आमदार, खासदार यांना देण्यात आले नव्हते. 
  • ठाकरे यांनी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची घोषणा दोन दिवसांपूर्वीच केली होती. त्यामुळे मुर्मू या मातोश्रीवर जाऊन त्यांची भेट घेतील अशी चर्चा होती. तसे काहीही झाले नाही.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाPresident Election 2022राष्ट्रपती निवडणूक 2022