शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

'सुंदर' बैलावरून वाद! गोळीबारात रणजित निंबाळकरांचा मृत्यू; सरकारकडून आर्थिक मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 13:21 IST

रणजित निंबाळकर यांचा गोळीबारात मृत्यू झाला.

बैलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध नाव असलेल्या रणजित निंबाळकर यांचा गोळीबारात मृत्यू झाला. बारामती तालुक्यातील निंबुत येथे सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांच्या निवासस्थानी २७ जून रोजी रात्री हा गोळीबार झाला होता. यामधील फलटण येथील रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान दि. २८ रोजी रात्री २ वाजता पुणे येथे मृत्यू झाला. त्यांच्या मृ्त्यूनंतर बैलगाडा क्षेत्रात एकच खळबळ माजली. आता शासनातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निंबाळकर यांची पत्नी श्रीमती अंकिता निंबाळकर यांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. ते म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील निंबुत येथे बैलगाडा शर्यतीत सहभागी होणाऱ्या 'सुंदर' नावाच्या बैलाच्या खरेदी विक्रीच्या वादातून हत्या झालेले बैलगाडा मालक रणजित निंबाळकर यांच्या पत्नी श्रीमती अंकिता निंबाळकर यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशेष बाब म्हणून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. या हत्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणातील मुख्य आरोपी गौतम काकडे याला अटक करून या सर्वांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. मात्र, निंबाळकर यांच्या उर्वरित कुटुंबांच्या भवितव्याचा विचार करून ही मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत या मदतीचा धनादेश निंबाळकर यांच्या पत्नीकडे सुपूर्द करण्यात आला.

दरम्यान, शहाजीराव काकडे यांचा मुलगा गौतम काकडे व फलटण येथील रणजित निंबाळकर यांचा शर्यतीच्या 'सुंदर' नावाच्या बैलाचा घेवाण देवाणचा व्यवहार होता. त्यामुळे रणजित निंबाळकर हे २७ जून रोजी रात्री निंबुत येथील गौतम काकडे यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यावेळी व्यवहारातून बाचाबाची होऊन झालेल्या भांडणातून गौतम काकडे यांचे भाऊ गौरव काकडे यांनी गोळीबार केला. यामध्ये निंबाळकर यांच्या डोक्यात गोळी लागल्याने त्यांना पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस