शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले, मोठा अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 17:01 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. केबलची वायर दिसल्याने अचानक हेलिकॉप्टरचं टेक ऑफ करण्यात आल्यानं मोठा दुर्घटना टळली आहे. 

भाईंदर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. केबलची वायर दिसल्याने अचानक हेलिकॉप्टरचं टेक ऑफ करण्यात आलं त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. हेलिकॉप्टर उतरत असताना हेलिकॉप्टर पायलटला अचानक ती केबल दिसली. पायलटने हेलिकॉप्टर लॅंड होत असताना ते पुन्हा टेकऑफ केलं त्यामुळे मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी ग्राऊंड इंजिनिअरला निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे. यापूर्वीही दोन- तीन वेळा मुख्यमंत्री हेलिकॉप्टर अपघातातून बचावले आहेत.

 मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस मीरारोड येथे नवीन वरसावे उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाच्या आगमनासाठी बुधवारी आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन स्क्वेअर अकॅडमी शाळेच्या मैदानात हैलिपॅड तयार करण्यात आले होते. हेलिकॉप्टर लँडिंगवेळी तेथील ओव्हरहेड वायरचा अडथळा होऊ नये, यासाठी त्या काढण्यात आल्या होत्या. दुपारी १२,४५ ते १ वाजेदरम्यान मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर लँड होतेवेळी दोन इमारतींच्यामध्ये लटकत असलेली केबलची वायर पायलटला दिसली. पायलटला जर वेळीच केबलची तार दिसली नसली तर हेलिकॉप्टर लँड होताना त्याचे पंखे वायरमध्ये अडकून मोठा अपघात घडला असता. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री होते. 

यापूर्वीच्या घटना -

काय घडले होते नाशिकमध्ये ?9 डिसेंबर 2017 रोजी हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर क्षमतेपेक्षा अधिक वजन झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं.

काय घडले होते रायगडमध्ये ?7 जुलै रोजी मुख्यमंत्री अलिबाग येथे आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि नाट्यगृहाच्या उदघाटन सोहळा आटोपून डोलवि-धरमतर येथील जेएसडब्ल्यू ईस्पात कंपनीच्या हेलिपॅडवर दुपारी १.५५ वाजण्याच्या सुमारास हेलिकप्टर मध्ये बसण्याकरीता चढत असतानाच हेलिकॉप्टरने अचानक टेक ऑफ घेण्यास प्रारंभ केला. हेलिकॉप्टरचा पंखा फडणवीस यांच्या डोक्याला लागण्याआधीच उपस्थित वरिष्ठ सुरक्षा रक्षक व पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना  बाजूला घेतल्याने ते थोडक्यात बचावले असल्याचे प्रत्यक्षदशीर्ने सांगितले.

 काय घडले होते लातुरात ?25 मे रोजी लातुरात मुख्यमंत्री आणि त्यांचा ताफा पाहण्यासाठी उत्सुकतेपोटी जमलेल्या प्रचंड गर्दीवर धूळ उडवत मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर मुंबईच्या दिशेने झेपावले आणि काही क्षणात ते जवळच्याच झोपडपट्टीतील रस्त्यावर कोसळले होते. धुळीचे लोट असल्याने नेमके काय घडले ते कोणालाच कळले नाही... पायलट संजय कर्वे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहा जण बालंबाल बचावले होते. या अपघातात पायलट कर्वे यांच्यासह इतर दोघे नागरिक किरकोळ जखमी झाले होते. निलंगा (जि. लातूर) येथील शिवाजी विद्यालयाच्या मैदानाजवळ सकाळी ११.४९ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला होता.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAccidentअपघात