शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
3
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
4
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
5
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
6
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
7
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
8
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
9
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
10
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
11
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
12
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
13
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
14
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
15
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
16
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
17
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
18
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
19
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
20
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार

आमच्या यात्रेनंतर अनेकांना यात्रा काढण्याचा उत्साह आलाय, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 10:55 IST

धुळे येथे प्रसारमाध्यमांना संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेनंतर विविध यात्रांचे बिगुल फुंकणाऱ्या विरोधी पक्षांना टोला लगावला आहे.

धुळे - भाजपाच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे.  या यात्रेदरम्यान धुळे येथे प्रसारमाध्यमांना संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेनंतर विविध यात्रांचे बिगुल फुंकणाऱ्या विरोधी पक्षांना टोला लगावला आहे. आम्ही यात्रा सुरू केल्यानंतर अनेकांना यात्रा काढण्याचा उत्साह आला, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी काढला आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला  सुरुवात झाली आहे. आम्ही महाजनादेश यात्रा काढल्यानंतर अनेक पक्षांना यात्रा काढण्याचा उत्साह आला आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो. पण खरंतर यात्रा काढण्याची परंपरा ही भाजपाची आहे. आम्ही विरोधात असताना संघर्ष यात्रा काढली होती. आता आम्ही संवाद यात्रा काढत आहोत. आमच्या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच हे सरकारच आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकते, असा विश्वास लोकांच्या मनात दिसून येत आहे.''

यावेळी विरोधकांनी सुरू केलेल्या यात्रांची परिस्थिती मांडून मुख्यमंत्र्यांनी त्यांना टोला लगावला. ''राष्ट्रवादीने सुरू केलेल्या यात्रेची काय परिस्थिती झाली आहे, हे तुम्हाला माहीतच आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची जत्रा निघाल्याने त्यांच्या यात्रेचे काय होईल ते माहित नाही,''असे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, राज्यात लोकांचा कल आमच्यासाठी अनुकूल आहे. राज्यात पुन्हा युतीचेच सरकार येईल. तसेच आम्हाला मोठे बहुमत मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी धुळे जिल्ह्यात केलेल्या विविध विकासकामांचा तपशीलही मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवला. तसेच विविध क्षेत्रात महाराष्ट्राची प्रगती होत असून, सर्व ठिकाणी राज्याचा क्रमांक पहिल्या तीनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाDhuleधुळेPoliticsराजकारण