मुख्यमंत्री बहुजन समाजाचा हवा होता
By Admin | Updated: November 3, 2014 04:03 IST2014-11-03T04:03:38+5:302014-11-03T04:03:38+5:30
राज्यात भाजपाचे सरकार आणण्यात राज्यातील ओबीसी आणि बहुजन समाजाचे मोठे योगदान आहे. बहुजनांना नेतृत्व मिळावे,

मुख्यमंत्री बहुजन समाजाचा हवा होता
पंढरपूर : राज्यात भाजपाचे सरकार आणण्यात राज्यातील ओबीसी आणि बहुजन समाजाचे मोठे योगदान आहे. बहुजनांना नेतृत्व मिळावे, अशी मतदारांची अपेक्षा होती. अपेक्षा असणे यात काही गैर नाही, मात्र पक्षाने सर्व कसोट्यांवर विचार करून मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतला आहे.
मला कोणते पद मिळाले, यापेक्षा आमचे सरकार आले यात मी समाधानी आहे, असे मत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी येथे व्यक्त केले. कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय पूजा करण्यासाठी खडसे रविवारी पंढरपुरात आले. त्यानिमित्त शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खडसे म्हणाले की, सेनेबरोबर आमचे गेल्या २५ वर्षांपासून चांगले संबंध आहेत. अनेक चढ-उतार आम्ही पाहिले आहेत. यादरम्यान काही कटुता आली तरी ती दूर करण्याचा प्रयत्न करू. दोन्ही पक्ष परत एकत्र यावेत, यासाठी दोघांचेही प्रयत्न सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांनी कोणतीही अट घातलेली नाही, त्यामुळे आम्ही लवकर एकत्र येऊ , असे खडसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)