गिरणी कामगारांना मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
By Admin | Updated: May 6, 2015 03:55 IST2015-05-06T03:55:56+5:302015-05-06T03:55:56+5:30
गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरणी कामगार कृती संघटनेमध्ये मंगळवारी मंत्रालयात बैठक पार पडली.

गिरणी कामगारांना मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
मुंबई : गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरणी कामगार कृती संघटनेमध्ये मंगळवारी मंत्रालयात बैठक पार पडली. त्यात एमएमआरडीएची तयार असलेली ११ हजार घरांची लॉटरी लवकरच काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचा दावा संघटनेने केला आहे.
संघटनेचे नेते दत्ता इस्वलकर यांनी सांगितले की फिन्ले मिल, जाम मिल, सीताराम मिल, मधुसूदन मिल, कोहिनूर मिल क्रमांक १ व २ या गिरण्यांची जमीन कामगारांच्या घरे उभारणीला मिळवून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. लॉटरी काढणे, घरांची किंमत ठरविणे तसेच गिरण्यांची जमीन ताब्यात घेण्यासाठी सरकार प्रयत्न करेल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचा दावा इस्वलकर यांनी केला आहे.