कापसाला बोनस देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
By Admin | Updated: April 8, 2015 23:03 IST2015-04-08T23:03:47+5:302015-04-08T23:03:47+5:30
राज्यात कापूस पणन महासंघ आणि कॉटन कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या (सीसीआय) माध्यमातून कापूस विक्री केलेल्या शेतकऱ्यांना गाठी आणि सरकीच्या

कापसाला बोनस देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
मुंबई : राज्यात कापूस पणन महासंघ आणि कॉटन कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या (सीसीआय) माध्यमातून कापूस विक्री केलेल्या शेतकऱ्यांना गाठी आणि सरकीच्या विक्रीतून आलेल्या नफ्याचे वाटप बोनस म्हणून करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत दिले.
राज्य सरकारने कापसाला ६ हजार ६८ रुपये क्विंटल इतका उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा, अशी शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. प्रत्यक्षात ४ हजार रुपये इतकाच भाव केंद्राने दिला. तेव्हा २ हजार रुपये फरकाची रक्कम राज्य सरकारने बोनस म्हणून द्यावी, अशी मागणी बच्चू कडू आणि जयकुमार रावल यांनी केली आणि दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी ती उचलून धरली. सहकार मंत्री चंद्रकांत पाटील उत्तर देऊ लागताच अगोदर भाव द्या, भाव द्या अशी जोरदार मागणी सदस्यांनी केली. सभागृहातील वातावरण पाहून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सरकारी यंत्रणांमार्फत खरेदी करण्यात आलेल्या कापसाच्या (गाठी) विक्रीतून आलेला नफा मूळ कापूस विकणाऱ्या शेतकऱ्यांना मिळावा, या संदर्भात आपण केंद्रीय वस्रोद्योग मंत्र्यांशी चर्चा केली असून ते या बाबत सकारात्मक आहेत. ते
उद्या मुंबईत येत असून या बाबत त्यांच्याशी पुन्हा चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. (विशेष प्रतिनिधी)