मारियांकडे मुख्यमंत्र्यांनी मागितला खुलासा

By Admin | Updated: June 22, 2015 03:18 IST2015-06-22T03:18:21+5:302015-06-22T03:18:21+5:30

मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी गतवर्षी लंडनमध्ये आयपीएलचे भूतपूर्व सर्वेसर्वा ललित मोदी यांच्या घेतलेल्या भेटीबाबत खुलासा करावा

The Chief Minister asked Maria to disclose | मारियांकडे मुख्यमंत्र्यांनी मागितला खुलासा

मारियांकडे मुख्यमंत्र्यांनी मागितला खुलासा

मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी गतवर्षी लंडनमध्ये आयपीएलचे भूतपूर्व सर्वेसर्वा ललित मोदी यांच्या घेतलेल्या भेटीबाबत खुलासा करावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानंतर मारिया यांच्यावरील कारवाईबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, मारिया यांनी मोदींच्या भेटीबाबत मीडियाकडे केलेल्या वक्तव्याबाबत त्यांच्याकडे खुलासा मागितला आहे. एक दिवसात त्यांनी त्यांचे म्हणणे सरकारला सादर करायचे आहे. त्यांनी माहिती दिल्यानंतर त्यांच्यावरील कारवाईबाबत निर्णय घेता येईल. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: The Chief Minister asked Maria to disclose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.