मुख्यमंत्र्यांसमक्ष खडसे मंत्र्यांवर बरसले
By Admin | Updated: March 30, 2017 03:53 IST2017-03-30T03:53:06+5:302017-03-30T03:53:06+5:30
माजी महसूल मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज उद्योग मंत्री सुभाष देसाई, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर

मुख्यमंत्र्यांसमक्ष खडसे मंत्र्यांवर बरसले
मुंबई : माजी महसूल मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज उद्योग मंत्री सुभाष देसाई, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर विधानसभेत प्रश्नांची सरबत्ती करीत त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. ‘मला माहिती आहे, तुम्ही उत्तर देऊच शकत नाही. यावर मुख्यमंत्रीच काय ते सांगतील, असे खडसेंनी देसाई यांना सुनावले.
उद्योग, ऊर्जा विभागाच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना खडसे यांनी सुभाष देसार्इंना सवाल केला की भूसंपादनाबाबतचे १९९५ सालचे परिपत्रक जिवंत आहे की मेले ते सांगा.भूसंपादन केल्यानंतर तीन वर्षांत भूसंपादन प्रक्रिया झाली नाही तर भूसंपादन रद्द होते असे सरकारचे ते परिपत्रक आहे. त्यावर सुभाष देसाई यांनी भोसरी एमआयडीसी प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे यावर अधिक भाष्य करू शकत नाही असे उत्तर दिले. त्यावर खडसे म्हणाले, मला माहिती आहे की तुम्ही उत्तर देउच शकत नाही. मुख्यमंत्रयांनीच याचे उत्तर द्यावे. तेव्हा मुख्यमंत्री देसाई यांच्या मदतीला धावले. हे परिपत्रक अस्तित्वात आहे की नाही याची माहिती विधी व न्याय विभागाकडून घेण्यात येऊन सभागृहासमोर ठेवला जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले.