सोलापूरात कृषी पंढरी कृषी प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन
By Admin | Updated: July 14, 2016 18:14 IST2016-07-14T18:14:32+5:302016-07-14T18:14:32+5:30
येथील कृषी पंढरी या कृषी प्रदर्शनाचे उद्धाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी मोठ्या थाटात करण्यात आले.

सोलापूरात कृषी पंढरी कृषी प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. १४ - येथील कृषी पंढरी या कृषी प्रदर्शनाचे उद्धाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी मोठ्या थाटात करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेतक-यांच्या जीवनात परिवर्तन झाले पाहिजे. त्यासाठी थेट शेतीमाल विक्रीचा निर्णय घेण्यात आला. मी बाजारपेठेच्या विरोधात नाही, मात्र शेतक-याला मारुन बाजारपेठ जिवंत ठेवायची नाही. तसेच, शेतक-यांची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. येत्या दोन वर्षात मायक्रो एरीगेशन ड्रीप खाली ४ लाख हेक्टर जमीन आणणार असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
या कृषी प्रदर्शनाच्या उद्धाटनप्रसंगी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, कृषीमंत्री फुंडकर, एकनथ खडसे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, मंत्री सदाभाऊ खोत, आ. प्रशांत परिचारक, माजी आ. सुधाकर परिचारक, आ. बबनराव शिंदे विभागीय आयुक्त एस चोकलिंगम जिल्हाधिकारी रणजीत कुमार आदी मंडळींनी हजेरी लावली होती.