मुख्यमंत्री, सरसंघचालक १५, १६ रोजी नाणीजमध्ये

By Admin | Updated: October 14, 2016 02:59 IST2016-10-14T02:57:54+5:302016-10-14T02:59:04+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १५ रोजी तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत १६ आॅक्टोबर रोजी रत्नागिरी तालुक्यातील नाणीज येथे एका कार्यक्रमासाठी

The Chief Minister, on the 15th, 16th Sarsanghchalak, in Nagasin | मुख्यमंत्री, सरसंघचालक १५, १६ रोजी नाणीजमध्ये

मुख्यमंत्री, सरसंघचालक १५, १६ रोजी नाणीजमध्ये

रत्नागिरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १५ रोजी तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत १६ आॅक्टोबर रोजी रत्नागिरी तालुक्यातील नाणीज येथे एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे नरेंद्राचार्यजी यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त वर्षभर विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. यापैकी ७३ हजार ३५२ रक्ताच्या बाटल्यांचा संकल्पपूर्ती सोहळा, तसेच मरणोत्तर देहदानाचा संकल्प करणाऱ्या ५६ हजार ५३७ दात्यांचा सत्कार या दोन दिवसांत होणार आहे. रविवारी होणाऱ्या कार्यक्रमाला केंद्रीय सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर हेही उपस्थित राहणार असल्याचे संस्थानतर्फे सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The Chief Minister, on the 15th, 16th Sarsanghchalak, in Nagasin