मुख्य वैद्यकीय अधिकारी लाच घेताना अटकेत
By Admin | Updated: October 27, 2016 01:52 IST2016-10-27T01:52:40+5:302016-10-27T01:52:40+5:30
विरार येथील ग्रामीण हॉस्पीटलचे मुख्य वैद्यकी अधिकारी डॉ. मनोज बनसोडे यांना १४ हजार रुपयांची लाच घेतली. ती घेताना त्यांना ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने
मुख्य वैद्यकीय अधिकारी लाच घेताना अटकेत
विरार : विरार येथील ग्रामीण हॉस्पीटलचे मुख्य वैद्यकी अधिकारी डॉ. मनोज बनसोडे यांना १४ हजार रुपयांची लाच घेतली. ती घेताना त्यांना ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने हॉस्पीटलमध्येच रंगेहाथ अटक केली.
डॉ. बनसोडे कार्यालयीन कामासाठी पैसे मागत असल्याची तक्रार हॉस्पीटलमधील एका कर्मचाऱ्याने केली होती. त्यावरून ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे डीवाएसपी अजय आफळे आणि पी.आय. दिलीप विचारे यांनी सापळा रचला होता. त्याप्रमाणे बुधवारी दुपारी बनसोडे यांना हॉस्पीटलमध्ये १४ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबात अधिक तपास सुरू आहे. (वार्ताहर)