छोटा राजनचा सहकारी विनोद चेंबूरचा मृत्यू
By Admin | Updated: April 11, 2015 02:31 IST2015-04-11T02:31:13+5:302015-04-11T02:31:13+5:30
डॉन छोटा राजनचा अत्यंत विश्वासू साथीदार गँगस्टर विनोद असरानी उर्फ विनोद चेंबूरचे शुक्र वारी, एका खाजगी रुग्णालयात निधन झाले

छोटा राजनचा सहकारी विनोद चेंबूरचा मृत्यू
मुंबई : डॉन छोटा राजनचा अत्यंत विश्वासू साथीदार गँगस्टर विनोद असरानी उर्फ विनोद चेंबूरचे शुक्रवारी, एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून विनोद आजारी होता. पुढील उपचारांसाठी त्याला परदेशात जायचे होते.
राजन टोळीत सक्रिय असलेल्या विनोदवर ज्येष्ठ पत्रकार जे. डे हत्याकांडासह दोन मोक्काचे गुन्हे दाखल होते. जेडे हत्याकांडात अटकेत असताना विनोदला यकृताचा गंभीर आजार जडला. उपचारांच्या सबबीवर त्याला जामीन मंजूर झाला होता. त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. यकृत प्रत्यारोपणासाठी त्याला परदेशात जायचे होते. त्या परवानगीसाठीचा अर्ज त्याने उच्च न्यायालयात केला होता. त्यावरील सुनावणी आज होणार होती. मात्र त्याच्या निधनानंतर हा अर्ज मागे घेण्यात आला.
विनोद राजनचा अत्यंत विश्वासू साथीदार होता.
जे डे हत्याकांडात विनोदची महत्त्वाची भूमिका होती. शूटर सतीश थांगप्पन जोसेफ उर्फसतीश काल्या याला ज ेडे व्यक्ती कोण आहे ते चेंबूरने दाखवले होते. त्यासाठी त्याने जेडे यांना एका बारमध्ये बोलावून घेतले होते. (प्रतिनिधी)