छोटा राजन दलित असल्याने अटक - रामदास आठवले
By Admin | Updated: October 30, 2015 18:37 IST2015-10-30T18:37:23+5:302015-10-30T18:37:23+5:30
इंडोनेशिया पोलिसांकडून अटक करण्यात आलेला कुख्यात डॉन छोटा राजन दलित असल्यामुळे त्याला लवकर अटक केली असावी अशी शंका रिपब्लिकन पक्षाने नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.
छोटा राजन दलित असल्याने अटक - रामदास आठवले
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - इंडोनेशिया पोलिसांकडून अटक करण्यात आलेला कुख्यात डॉन छोटा राजन दलित असल्यामुळे त्याला लवकर अटक केली असावी अशी शंका रिपब्लिकन पक्षाने नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना रामदास आठवले म्हणाले, छोटा राजनच्या आधी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला अटक करायला हवी होती, तसे झाले नाही. छोटा राजन हा दलित असल्यामुळे त्याला लवकर अटक केली का, अशी शंका त्यांनी उपस्थित केली.
दरम्यान, याप्रकरणी रामदास आठवले यांच्या या व्यक्तव्यावर सोशल मीडियातून जोरदार टिका होत आहे. तर दुसरीकडे छोटा राजन अटक केल्यामुळे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
छोटा राजन उर्फ राजेंद्र सदाशिव निकाळजे याच्यावर भारतात ७० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याला इंडोनेशियात पकडण्यात आल्यानंतर आता त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने मुंबई पोलिसांकडून छोटा राजनची फाईल मागितली असून एकूणच छोटा राजनच्या प्रत्यार्पणासाठी किमान वीस दिवस लागू शकतात, असे सूत्रांनी सांगितले.