शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

नक्षलग्रस्त भागात बिघडले मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर

By admin | Updated: May 12, 2017 19:17 IST

मुख्यमंत्र्यांसारख्या व्हीव्हीआयपींचे हेलिकॉप्टर अतिसंवेदनशिल अशा नक्षलग्रस्त भागात बिघडण्याची घटना

ऑनलाइन लोकमतगडचिरोली, दि. 12 : मुख्यमंत्र्यांसारख्या व्हीव्हीआयपींचे हेलिकॉप्टर अतिसंवेदनशिल अशा नक्षलग्रस्त भागात बिघडण्याची घटना शुक्रवारी गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी येथे घडली. यामुळे मुख्यमंत्र्यांना अहेरीवरून चंद्रपूरमार्गे नागपूरपर्यंत तब्बल २७० किलोमीटरचा प्रवास कारने करावा लागला.पोलीस विभागाची तारांबळ उडविणारा हा प्रकार एकाद्या अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या बाबबीत पहिल्यांदाच गडचिरोलीमध्ये घडला. जिल्ह्यात विविध कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री सकाळी ११ वाजता दाखल झाले होते. चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे लोह खनिज प्रकल्प उभारणीच्या कोनशिला अनावरण कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर नक्षली कारवायांच्या दृष्टीने अतिसंवेदनशिल असलेल्या बामनपेठच्या तलावाजवळ उतरले. तिथे तलावाच्या खोलीकरणाचा शुभारंभ करून ते हेलिकॉप्टरने अहेरी येथील पोलीस उपमुख्यालयात दाखल झाले. तेथे नक्षल कारवाया आणि सुरक्षा यावरील बैठक झाली. तेथून आलापल्लीच्या रेस्ट हाऊसमध्ये आयोजित जिल्ह्याच्या आढावा बैठकीस उपस्थित झाले. त्यानंतर दुपारी ३.१५ च्या सुमारास अहेरी येथील प्राणहिता पोलीस उपमुख्यालयाच्या मैदानावरून नागपूरकडे रवाना होण्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये बसले. हेलिकॉप्टरने हवेत झेपही घेतली. पण काहीतरी तांत्रिक गडबड असल्याची जाणीव पायलटला झाली. त्यामुळे त्याने हेलिकॉप्टर पुन्हा खाली उतरविले.तपासणी करून पुन्हा हेलिकॉप्टर सुरू करण्याचा प्रयत्न केला असता ते सुरूच झाले नाही. अखेर धावपळ करीत मुख्यमंत्र्यांनी कारने नागपूर गाठण्याचा निर्णय घेतला. अहेरी ते नागपूर हे तब्बल २७० किलोमीटरचे अंतर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला कारने पार करावे लागले. चंद्रपूर येथून ५.३० वाजता मुख्यमंत्री नागपूरकडे रवाना झाले होते. दरम्यान बिघडलेले हेलिकॉप्टर अहेरी येथेच असून त्यातील तांत्रिक बिघाडाची तपासणी करण्यासाठी नागपूर येथून तंत्रज्ञ रवाना झाले आहेत.