शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

आनंदाची बातमी! शिवरायांची जगदंबा तलवार महाराष्ट्रात आणणार; सरकारची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 18:27 IST

राज्य सरकारच्या या प्रयत्नांना यश आल्यानंतर महाराष्ट्राची गौरवशाली इतिहासाची साक्षीदार ही जगदंबा तलवार लोकांना पाहता येणार आहे. 

मुंबई - शिवप्रताप दिनानिमित्त महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण पसरणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार पुन्हा महाराष्ट्रात आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. २०२४ पर्यंत जगदंबा तलवार राज्यात आणली जाईल अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. 

अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवल्यानंतर राज्य सरकारनं आणखी एक आनंदाची बातमी शिवप्रेमींना दिली आहे. १८७५ च्या आसपास छत्रपतींची जगदंबा तलवार ब्रिटनला नेण्यात आली होती. ही तलवार पुन्हा मिळावी यासाठी केंद्र सरकारकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. २०२४ पर्यंत ही तलवार पुन्हा राज्यात येईल अशी अपेक्षा आहे. ही तलवार सध्या इग्लंडच्या ताब्यात आहे. ऋषी सुनक इग्लंडचे पंतप्रधान झाल्यानंतर आता ही तलवार महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकार पाऊल टाकत आहे. राज्य सरकारच्या या प्रयत्नांना यश आल्यानंतर महाराष्ट्राची गौरवशाली इतिहासाची साक्षीदार ही जगदंबा तलवार लोकांना पाहता येणार आहे. 

जगदंबा तलवारीचं महत्त्व काय?करवीर छत्रपतींकडे शिवाजी महाराजांनी वापरलेली तलवार होती. तिचं नाव जगदंबा तलवार होतं. ही तलवार सन १८७५ मध्ये करवीर छत्रपती चौथे महाराज यांनी भारत दौऱ्यावर आलेल्या प्रिन्सला जबरदस्तीची भेट म्हणून देण्यात आली. ही तलवार शिवाजी महाराजांनी वापरली होती असं ब्रिटीश दस्तावेजात आहे. कोल्हापूरात जे दस्तावेज आहेत त्यात या शिलेखानात नोंद आहे. ही तलवार पुन्हा आणावी यासाठी १९०० दशकात अनेक प्रयत्न सुरू होते. महाराष्ट्र शासनाने ही तलवार परत आणण्यासाठी प्रयत्न करत असतील तर आमच्यासारख्या अभ्यासकांसाठी ही आनंदाची बाब आहे असं इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली जगदंबा ही तलवार सध्या इंग्लंड येथील राणीच्या वैयक्तिक संग्रहालयात रॉयल कलेक्शन ट्रस्ट येथे ठेवण्यात आली आहे. तलवारीचे वर्णनजुनी युरोपिअन एकपाती, सरळ तलवार, ज्याच्या दोन्ही बाजूला दोन खोबणी असून, एकामध्ये आयएचएस असे तीन वेळा कोरले आहे. तलवारीच्या मुठीजवळील गजावरती सोन्यामध्ये फुलांची नक्षी कोरली आहे. तलवारीची मूठ लोखंडी असून, त्याला गोलाकार परज असून, शेवटचे टोक अणकुचीदार आहे आणि त्यावर भरीव सोन्याने कोरलेली फुलांची नक्षी असून, त्यामध्ये मोठे हिरे व माणिक जडवलेले आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज