मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द मोडला; छत्रपती संभाजीराजे यांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 11:29 AM2022-05-27T11:29:16+5:302022-05-27T11:56:16+5:30

स्वाभिमानाने आणि सन्मानाने राहणारं माझं व्यक्तिमत्व आहे. मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य संघटना पुढे कार्यरत ठेवणार आहे असं संभाजीराजे म्हणाले.

Chhatrapati Sambhaji Raje targeted CM Uddhav Thackeray and Shivsena | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द मोडला; छत्रपती संभाजीराजे यांचा गौप्यस्फोट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द मोडला; छत्रपती संभाजीराजे यांचा गौप्यस्फोट

googlenewsNext

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(Uddhav Thackeray) दिलेला शब्द मोडला. ही अपेक्षा त्यांच्याकडून नव्हती. मी शिवसेनेत प्रवेश करावा अशी ऑफर मला दिली. परंतु मी त्यास नकार दिला. परंतु शिवसेना पुरस्कृत महाविकास आघाडी उमेदवार म्हणून मला पाठिंबा द्यावा अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली. सगळं काही ठरलं. त्यांचे खासदार, मंत्र्यांशी चर्चा केली. पण कोल्हापूरला जाताना वेगळ्याच बातम्या समोर आल्या असा खुलासा छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे.

छत्रपती संभाजीराजे(Yuvraj Chhatrapati Sambhajiraje) म्हणाले की, शिवसेनेत प्रवेश करा तुम्हाला खासदार करू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. परंतु मी प्रवेश करणार नाही स्पष्ट सांगितले. माझी उमेदवारी ही घोडेबाजारासाठी नव्हती. सगळ्या पक्षातील लोकांनी मला मदत करावी. निष्कलंक माझं व्यक्तिमत्व आहे. घोडेबाजार होऊ नये म्हणून मी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतोय. ही माघार नाही तर माझा स्वाभिमान आहे असं त्यांनी सांगितले आहे.

तसेच राज्यसभा निवडणूक लढवणार नसल्याने मी मोकळा झालो आहे. माझी कुणाशीही चर्चा झाली नाही. माझ्यासाठी खासदारकी महत्त्वाची नाही. माझ्यासाठी जनता महत्त्वाची आहे. स्वाभिमानाने आणि सन्मानाने राहणारं माझं व्यक्तिमत्व आहे. मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य संघटना पुढे कार्यरत ठेवणार आहे. स्वराज्य संघटना मजबूत करणार आहे. राज्यभरात दौरे करून संघटनेला उभारी देणार आहे. मला माझी ताकद ४२ आमदार नाही तर जनता आहे असं संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.

बाळासाहेबांचे संस्कार, उद्धव ठाकरेंनी शब्द मोडला नाही; शिवसेनेचा संभाजीराजेंवर पलटवार

शिवसेनेसोबत काय घडलं?

मी अपक्ष म्हणून राज्यसभा निवडणूक लढवणार होतो. मला कुठल्याही पक्षाचा द्वेष नाही. मला सगळी गणिती माहिती होती. पुढचा प्रवास खडतर होता याची जाणीव होती. मला शिवसेना खासदारांचे फोन आले. ओबेरॉयमध्ये आमची बैठक झाली. शिवसेनेत प्रवेश करावा अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे असं त्यांनी सांगितले. परंतु मी शिवसेनेत प्रवेश करू शकत नाही हे स्पष्टपणे सांगितले. मुख्यमंत्र्यांना भेटायला वर्षावर गेलो. या भेटीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत येण्याची ऑफर दिली. परंतु मी शिवसेना पुरस्कृत महाविकास आघाडीचा अपक्ष उमेदवार म्हणून मला पाठिंबा द्यावा असा प्रस्ताव दिला. त्यावर सगळं काही ठरलं. ड्राफ्ट फायनल झाला. त्यानंतर मी कोल्हापूरला जायला निघालो तेव्हा संजय पवारांना उमेदवारी दिल्याचं कळालं. सगळ्या अपक्ष आमदारांवर दबाव होता. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला असा गौप्यस्फोट संभाजीराजे यांनी केला.  

Web Title: Chhatrapati Sambhaji Raje targeted CM Uddhav Thackeray and Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.