छगन भुजबळ उपचार प्रकरणात तात्याराव लहाने दोषी
By Admin | Updated: January 13, 2017 18:20 IST2017-01-13T18:14:24+5:302017-01-13T18:20:24+5:30
छगन भुजबळ यांच्यावरील जेजे रुग्णालयातील उपचार प्रकरणी विशेष ईडी न्यायालयाने तात्याराव लहाने यांना दोषी ठरवल आहे.

छगन भुजबळ उपचार प्रकरणात तात्याराव लहाने दोषी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणी तुरुगांत असलेले छगन भुजबळ यांच्यावरील जेजे रुग्णालयातील उपचार प्रकरणी विशेष ईडी न्यायालयाने तात्याराव लहाने यांना दोषी ठरवल आहे. अंजली दमानिया यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ईडीने कोर्टाने हा निकाल दिला.
छगन भुजबळांना जेजेमधून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये तात्याराव लहाने यांच्या शिफारशीमुळे दाखल केले आणि त्यामुळे त्यांनाव्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. याप्रकरणी त्यांनी पीएमएलए कोर्टात याचिका दाखल केली होती. तात्याराव लहानेंनी केलेला युक्तीवाद न्यायालयाला पटला नाही.