शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

"तू किस झाड की पत्ती", छगन भुजबळांची मनोज जरांगेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 13:36 IST

अनेक मोठे मोठे लोक अंगावर घेतले आहेत. तू किस झाड की पत्ती आहे, असे म्हणत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. 

गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यात वाकयुद्ध होताना पाहायला मिळत आहे. गावबंदीमुळे आमदार खासदार यांना गावात जाण्यापासून मज्जाव करण्यात आला  आहे. त्यांना काम करू दिले जात नव्हते. हा गुन्हा आहे याला एक महिन्याची शिक्षा देखील आहे. या तारखेपर्यंत द्या आणि त्या तारखेपर्यंत द्या म्हणजे ब्लॅकमेलिंग नाही तर आणखी काय आहे? सरकारने तीन तीन न्यायाधीश बसवले आहे वाट पाहा, असा सल्ला देत मी अनेक मोठे मोठे लोक अंगावर घेतले आहेत. तू किस झाड की पत्ती आहे, असे म्हणत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. 

आम्ही गप्प बसायचं, मग त्यांनी जाळपोळ करायची. बीडमधील जाळपोळ ठरवून करण्यात आल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला. २४ डिसेंबरचा सरकारवर दबाव टाकण्यात येत आहे. झुंडशाहीला, दादगिरीला माझा विरोध आहे. समाज माध्यमावरील मेसेजही वाचून दाखवला आहे.  प्रकाश सोळंकी, संदीप क्षीरसागर यांची घरं जाळली त्याप्रमाणेच माझंही घर जाळलं जाईल भुजबळांनी  भीती व्यक्त केली आहे. मराठा आरक्षणासाठी सरकार प्रयत्न करत आहे. बीडमध्ये अनेकांची घरं, कार्यालय ऑफिस कट करून पेटवण्यात आली. यात जीवितहानी होण्याची शक्यता आहे  मात्र ते वाचले, असे छगन  भुजबळ म्हणाले. 

याचबरोबर, काही नेत्यांनी छगन भुजबळ यांच्या भूमिमेकवर भाष्य केले आहे. यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, एकदा ओबीसीमध्ये आल्यानंतर शैक्षणिक आणि राजकीय आरक्षण लागू होणार आहे. ओबीसीमध्ये आलात तर त्याला सर्व लाभ मिळतात. या विषयावर नेते बोलायला घाबरतात. याचे मुख्य कारण निवडणूक आहे. प्रत्येकला वाटत आहे, विरोधात बोलले तर मराठा समाजाचे मत मिळणार नाही, म्हणून भुजबळ यांच्या विरोधात बोला, असे छगन भुजबळ म्हणाले. याशिवाय,  माझे वय ७६ वर्षे आहे. गेली ३५ वर्ष ओबीसीसाठी काम करत आहे. मी जेव्हा राजकारणात आमदार होतो तेव्हा फडणवीस नव्हते. कोणी मला सांगावे अशी परिस्थिती नाही,  माझे निर्णय माझे असतात आणि परिणाम भोगण्याची माझी तयारी आहे, असेही छगन भुजबळ म्हणाले. 

१७ डिसेंबरच्या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरणार -  मनोज जरांगे पाटील २४ तारखेपर्यंत मी कुणावर बोलणार नाही. त्यानंतर मराठा समाज कोण आहे, हे सगळ्यांना कळेल. २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळाले नाही तर पुढील लढाईसाठी आम्ही सज्ज आहोत, असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले होतं. त्याच अनुषंगाने आज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरकारने दिलेल्या शब्दाचा पुन्हा एकदा उल्लेख केला. आमदार बच्चू कडू यांच्याकडे ते पत्र आहे, ज्यात सरकारने आम्हाला मराठा आरक्षणासंदर्भात लेखी दिलं होते, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. १७ डिसेंबरच्या बैठकीत आमची आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. सरकारने आम्हाला जे लिहून दिलं होतं, त्यानुसार १७ डिसेंबरपर्यंत आम्हाला मराठा आरक्षणासंदर्भात लेखी मिळायला हवं होते. मात्र, अद्याप तसं काहीही आम्हाला मिळालेलं नाही. सरकारने आम्हाला लिहून दिलं होतं, त्याचे व्हिडिओही आहेत. जर १७ डिसेंबरपर्यंत आम्हाला आरक्षण मिळालं नाही, त्याबाबतचा आदेश मिळाला नाही. तर, तुमचा-आमचा विषय संपला. त्या दिवशीच्या बैठकीत आम्ही पुढील आंदोलनाची घोषणा करणार आहोत. तसेच, मीडियाला आमच्याकडे असलेले सर्व कागदपत्र आणि व्हिडिओ देणार असल्याचंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. 

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण