शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

"शरद पवार म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ"; छगन भुजबळांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 16:36 IST

शरद पवार यांना अभिप्रेत शासन आणण्यासाठी प्रयत्न करा, कार्यकर्त्यांना सल्ला

Sharad Pawar Birthday, Chhagan Bhujbal: शरद पवार म्हणजे राजकारण, समाजकारण, विकास, शिक्षण, कला, संस्कृती, क्रीडा, साहित्य, शेती या विषयांचे चालते-बोलते विद्यापीठ आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त स्व. यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथून व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सहभागी झाल्या होत्या.

"शरद पवार यांनी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा कुटुंबीयांकडून मिळालेला वारसा कायम जपला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे देशावरच नाही तर जगावर उपकार आहे. त्यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देऊन त्यांचा सन्मान केला. देशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी सारखा महत्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला. शेती क्षेत्रात त्यांच्या माध्यमातून क्रांती झाली त्यामुळे आज जगाला शेती उत्पादने निर्यात करणारा भारत हा महत्वपूर्ण देश बनला आहे हे शरद पवार यांचे योगदानआहे. राज्यात महिला आयोगाची स्थापना केली. महिलांना आपले हक्क मिळवून दिले. महिलांना सर्व क्षेत्रात समान आरक्षण मिळवून दिलं. शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण उपलब्ध करून दिले," अशा शब्दांत त्यांनी शरद पवार यांच्या कार्याचा गौरव केला.

शरद पवार यांना अभिप्रेत शासन आणण्यासाठी प्रयत्न करा!

"शरद पवार यांनी केवळ देशात नाही तर जगभरात महत्वाची माणसे जोडली आहेत. त्यांना देशात संविधानावर काम करणारे, राज्यघटनेला अभिप्रेत लोकशाहीवर चालणारे, फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचे सरकार दिल्लीत आणि राज्यात अभिप्रेत आहे. त्यासाठी तुमचे आमचे कर्तव्य आहे की त्यांना अभिप्रेत असलेले शासन देशात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे," असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

शिंदे फडणवीसांनी वाचाळवीरांना समज द्यावी!

मंत्रालयात सर्व महापुरुषांच्या सोबत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेश द्वारावर लावण्यात आली, त्याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार मानतो. परंतु त्यांच्याच मंत्रिमंडळात काम करणारे काही मंत्री महापुरुषांच्या विरोधात चुकीची टिप्पणी करत आहेत हे योग्य नाही. या वाचाळवीरांना आता  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आवरले पाहिजे आणि त्यांना कडक समज दिली पाहिजे अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारChhagan Bhujbalछगन भुजबळ