शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 00:06 IST

Chhagan Bhujbal News: मनोज जरांगेंनी २५ वेळा उपोषण केले आणि सोडले. कुणी विचारत नव्हते. निवडणुकीत धडा शिकवणार, असा निर्धार करत, तेव्हाची वस्तुस्थिती माहिती असतानाही, पवार तिथे गेले, असा खळबळजनक आरोप छगन भुजबळ यांनी केला.

Chhagan Bhujbal News: त्याच्यामध्ये काही आमदार होते. होय, पवार साहेबांचे आमदार होते. मी नावेही घेऊ शकतो. अनेक गोष्टी नंतर बाहेर पडल्या. यांनी सांगितले त्याप्रमाणे सगळ्या गच्च्यांवर दगड ठेवले. सकाळी पोलीस आले, तेव्हा तुफान दगडांचा मारा सुरू झाला. पोलीस पळत होते. घरामध्ये आश्रय घेण्याचा प्रयत्न करत होते. घरातून लाथा घालून त्यांना बाहेर काढले. परत बाहेर चोपायचे. महिला पोलीसही त्यात होत्या, त्यांना त्रास झाला. महिला पोलिसांसह ८४ पोलीस रुग्णालयात दाखल झाले. आजही याचा रेकॉर्ड त्या रुग्णालयात आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला. ते समता परिषदेच्या मेळाव्यात बोलत होते. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंतरवाली सराटीमध्ये आंदोलन सुरू होते, या आंदोलनादरम्यान मोठा राडा झाला होता. यावेळी पोलिसांवर दगडफेक झाल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर बोलताना छगन भुजबळ यांनी मोठा दावा केला आहे. त्यांचा प्लान आदल्या रात्रीच ठरला होता.  शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना वस्तुस्थिती माहिती असतानाही, शरद पवार त्या ठिकाणी गेले, असेही भुजबळ यांनी सांगितले. छगन भुजबळ यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर आता राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना सुरुवात झाली असून, नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

मनोज जरांगेंनी २५ वेळा उपोषण केले, सोडले, त्यांना कुणी विचारत नव्हते

पवार साहेब, दोन वर्षांपासून मनोज जरांगे उपोषण करत होते. २५ वेळा उपोषण केले, कुणी त्यांना विचारले नाही. ते उपोषण करायचे आणि सोडायचे. मग रात्रीतून बैठका झाल्या. त्यात काही आमदार होते. निवडणूक आली की, जरांगे उभा राहतो. जरांगे उभा राहिला की, काही लोक पाया पडायला जातात. मग पैसे घ्या, अमूक घ्या, तमूक घ्या, सुरू होते. हे काय चालले आहे. तुम्ही एकत्र झालात आणि ठरवले की, जे जरांगेच्या पायाशी जातील, त्यांना आपल्या विरोधात सपोर्ट करतील, त्यांना निवडणुकीत धडा शिकवणार, असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले.

दरम्यान, आपली मागणी आहे की, ते ६ जीआर मागे घ्या किंवा त्यात आवश्यक सुधारणा करा. त्यात निश्चितच आम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सांगितले होते की, जनहित याचिका नको, रिट याचिका करा,  आतापर्यंत आम्ही ४-५ रीट याचिका केल्या आहेत. आरक्षणाचा पाया आर्थिक विषयावर नाही, सामाजिक मागासलेपणावर आहे.  आमचीही लेकरेबाळेच आहेत. ओबीसी जात नाही, अनेक जातींचा समूह आहे, छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळSharad Pawarशरद पवारMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण