शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

रातराणी, इंजेक्शन आणि बाळासाहेब

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 07:58 IST

‘आपली पोरं जिंकली’ म्हणून त्यांनी जल्लोषच केला असता. व्यंगचित्रकार असल्याने राजकीय - सामाजिक अभ्यास तर आपसूकच होता. आपल्या मतावर ठाम, एखादा विचार मांडल्यावर त्यावर ठाम-कायम राहणारे नेते म्हणजे बाळासाहेब.

छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री -

व्ही.जे.टी.आय.चा विद्यार्थी असताना व्यंगचित्रकार बाळ ठाकरे यांच्या विचारांकडे ओढला गेलो. हो, तेव्हा ते बाळ ठाकरे होते. ते राजकारणात आले नसते तर जागतिक कीर्तीचे संपादक झाले असते. परदेशी संस्था त्यांच्याकडून व्यंगचित्र घेत. पण, शिवाजी पार्कच्या त्या ऐतिहासिक सभेनंतर ते राजकारणात आले आणि  ‘बाळासाहेब’  बनले. हा मोठा प्रवास प्रत्यक्ष पाहिलेले बहुतेक सहकारी आज हयात नाहीत, काही जण तब्येतीमुळे उपलब्ध नाहीत. अजून गाडी सुरू आहे, असा कदाचित मी एकटाच असेन. या प्रदीर्घ प्रवासात अनेक आठवणी आहेत. अतिशय नीटनेटकेपणा असलेले बाळासाहेब, क्रिकेटचे निस्सीम चाहते बाळासाहेब. आज बाळासाहेब असते तर ऑस्ट्रेलियातील विजयाने त्यांना प्रचंड आनंद झाला असता. ‘आपली पोरं जिंकली’ म्हणून त्यांनी जल्लोषच केला असता. व्यंगचित्रकार असल्याने राजकीय - सामाजिक अभ्यास तर आपसूकच होता. आपल्या मतावर ठाम, एखादा विचार मांडल्यावर त्यावर ठाम-कायम राहणारे नेते म्हणजे बाळासाहेब.'बाळासाहेबांचे फुलांवर खूप प्रेम होते. अनेकदा कात्री वगैरे घेऊन ते बागकाम करीत असत. चार-पाच महिन्यांतून एकदातरी ते सहकुटुंब आमच्या नाशिकच्या शेतावर आवर्जून येत. फुलांचा बगीचा आणि आयुर्वेदिक वन उभारण्याची इच्छा ते अनेकदा बोलून दाखवत. विविध झाडे आणि फुलांच्या माहितीचा एका खजानाच त्यांच्याकडे होता. नाशिकच्या घरी आम्ही रातराणीचे झाड लावत होतो. फार काही विचार त्यामागे नव्हता, दिसली जागा की लावले, असा आमचा मामला. पण, बाळासाहेबांचे तसे नव्हते. त्यांनी जागा बदलायला लावली. वारा कोणत्या बाजूने वाहतो, मग रातराणीचा सुगंध घरात येईल अशा पद्धतीने ते लावायला हवे, असे सांगत त्यांनी योग्य जागी ते रोप लावायला लावले. त्याचा दरवळ आजही आहे. शाखाप्रमुख ते नगरसेवक नंतर आमदार आणि मुंबईचा महापौर म्हणून संघटना उभारणीसाठी मी राज्यभर फिरायचो. एकदा जालन्याला जाहीर सभा होती. तेव्हा नेमके माझ्या पत्नीची तब्येत बिघडली, ऑपरेशन करावे लागणार होते. पण, सभा आधीपासून ठरलेली आणि अनेक लोक त्याकामी गुंतलेले होते. त्यामुळे आदल्या दिवशी ठरल्याप्रमाणे मी सभेला गेलो. पण, खुद्द बाळासाहेब आणि माँसाहेब दवाखान्यात माझ्या पत्नीसाठी थांबले होते. संपूर्ण वेळ तिथे त्यांनी व्यवस्था सांभाळली. कुटुंबप्रमुखाचे ते रूप होते.आजूबाजूला त्यांचे बारीक लक्ष असे. आपल्या विषयांबाबत ते आग्रही होते. उपचारांबद्दलही तसेच होते. त्यांच्याकडे होमिओपॅथीची पेटीच होती. त्यात एकेका आजारासाठी एक - एक कुपीच होती. त्यात ते जाणकारही होते. एकदा ते आजारी पडले होते. तेव्हा डाॅक्टर उपचार करीत होते पण सुधारणा नव्हती. साहेब अगदीच कृश दिसू लागले. तेव्हा आम्ही डाॅक्टरांना गाठले. बाळासाहेबांना काही झाले तर सोडणार नाही, अशी तंबीच दिली. तेव्हा उलट डाॅक्टरच म्हणाले, ‘बरे झाले तुम्ही भेटलात. मीपण तुमच्या सारख्यांच्या शोधात होतो. जो बाळासाहेबांना ॲलोपॅथी उपचार घ्यायला भाग पाडेल. ती औषधे-इंजेक्शन घ्यायला लावेल.’ मग, पुढे के.ई.एम.च्या डाॅक्टर दळवींना पुढे करत आम्ही ती जबाबदारी पार पाडली.

मी कंठलंगोट साेडली -मी मुंबईचा महापौर होतो तेव्हाचा एक प्रसंग आठवतो. ‘सुंदर मुंबई - मराठी मुंबई’, वाहतुकीच्या बेटांचे सुशोभीकरण वगैरे धडाका सुरू होता. अनेकांच्या भेटीगाठी, कार्यक्रम वगैरे असायचे. हळूहळू कोट-टाय असा वेश बनला. एकदा अशाच वेशात बाळासाहेबांसमोर गेलो.मला पाहून ते म्हणाले, ‘काय हो, भुजबळ; तुमच्या सुंदर मराठी मुंबईत ती कंठलंगोट कशी काय शोभेल?’ त्यांच्या या वाक्याने काय समजायचे ते उमजून गेलो. त्यानंतर कधीच कंठलंगोट चढवली नाही. 

टॅग्स :Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्र