शहांची ‘छबी’ गायब

By Admin | Updated: October 5, 2014 02:25 IST2014-10-05T02:25:38+5:302014-10-05T02:25:38+5:30

भाजपाध्यक्ष अमित शहा यांची छबी भाजपाच्या मुंबईत ठिकठिकाणी लागलेल्या पोस्टर्सवरून गायब झाली आहे. शहा यांच्या मुंबईत जाहीर सभा न घेण्याचा निर्णय भाजपाने यापूर्वीच घेतला आहे.

The 'Chhabi' disappeared from the ceiling | शहांची ‘छबी’ गायब

शहांची ‘छबी’ गायब

>मुंबई : भाजपाध्यक्ष अमित शहा यांची छबी भाजपाच्या मुंबईत ठिकठिकाणी लागलेल्या पोस्टर्सवरून गायब झाली आहे. शहा यांच्या मुंबईत जाहीर सभा न घेण्याचा निर्णय भाजपाने यापूर्वीच घेतला आहे. त्यामुळे आता या शहांना मतदानापूर्वीच गाशा गुंडाळून गुजरातकडे रवाना व्हावे लागणार, अशी चर्चा आहे.
शहा यांच्या इशा:यावरून शिवसेनेसोबतची 25 वर्षाची युती तुटल्याने मुंबई, ठाणो व अन्य काही शहरांत मराठी मतांचे ध्रुवीकरण होण्याची चिन्हे दिसत असल्याने भाजपाचे धाबे दणाणले आहे. त्यामुळेच आता मुंबईत ठिकठिकाणी लागलेल्या पोस्टर्सवरून शहा यांची गच्छंती झाली आहे. शहा जर आमच्या मतदारसंघात येऊन भाषण करून गेले तर एकही मराठी मत मिळणार नाही, अशी भीती अनेक भाजपा उमेदवारांना आहे. 

Web Title: The 'Chhabi' disappeared from the ceiling