छाती थी ५६ इंच, लालूने सिकोड दिया

By Admin | Updated: February 15, 2016 03:53 IST2016-02-15T03:53:00+5:302016-02-15T03:53:00+5:30

छाती थी जिसकी ५६ इंच, लालूने उसको सिकोड दिया, दूध ने चाय को, सच ने अन्याय को, भैस ने गाय को हरा डाला... बिहार विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजद नेते लालूप्रसाद यादव

The chest was 56 inches, Lalu secured the sequence | छाती थी ५६ इंच, लालूने सिकोड दिया

छाती थी ५६ इंच, लालूने सिकोड दिया

कुमार बडदे,  मुंब्रा
छाती थी जिसकी ५६ इंच, लालूने उसको सिकोड दिया, दूध ने चाय को, सच ने अन्याय को, भैस ने गाय को हरा डाला... बिहार विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजद नेते लालूप्रसाद यादव यांच्याकडून झालेल्या पराभवाचे हे वर्णन आहे. तर, दाल की किंमत २०० के उसपार खडी है, जबसे भारत की धरती को एक मनहूस मिला है. ‘अच्छे दिन’ क्या होते है, यह अंबानी से पुछो, ‘अच्छे दिन’ का फर्क जानना है तो लालकृष्ण अडवाणी से पुछो... ही मोदींच्या घोषणाबाजीची खिल्ली आहे. येथील बहुप्रतीक्षित मुशायऱ्यात इमरान प्रतापगढी यांनी शेरोशायरीच्या माध्यमातून थेट पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले.
कौसा आणि आजूबाजूच्या परिसरांतील हजारो नागरिक ज्या मुशायऱ्याची वर्षभर उत्सुकतेने वाट पाहतात, तो शनिवारी रात्री ९ ते पहाटे ३ वाजेपर्यंत येथील मित्तल पटांगणावर पार पडला. त्यामध्ये प्रतापगढी यांनी मोदी यांच्यावर थेट नाव न घेता अप्रत्यक्ष टीका करणारी शेरोशायरी सादर केली.
‘अच्छे दिन’वर टीका करताना प्रतापगढी म्हणाले की, जो कल तक कातिल थे वह अब कानून के रखवाले है, ओर लोगों को लगता है ‘अच्छे दिन’ आने वाले है. ‘अच्छे दिन’ तो नही आये लेकिन चेहरा मायुस मिला है, लब्जबाजी करनेवाला उमदा जासूस मिला है. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी एक छोटीशी रचना पेश केली. अभिनेत्री सलमा आगा यांनी त्यांच्या चित्रपटातील गीते सादर केली. हीना अंजुम यांनी स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर भाष्य केले.
जफर इमाम यांनी जीवनातील चढउतारांवर भाष्य केले. सतलज रहात, अलताफ जिया, आखिलराज इंदौरी, ताहिर फराज, अकिल अहमद, शबाना शबनम, राहत इंदौरी आदींनी उपस्थितांची दाद मिळवली.
उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कार्यक्रमाला आमदार जितेंद्र आव्हाड, मुंब्रा प्रभाग समितीचे अध्यक्ष अशरफ पठाण, किमान वेतन सल्लागार आयोगाचे अध्यक्ष सय्यद अली अशरफ, या कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे
विभागीय अध्यक्ष शमीम खान, पोलीस आयुक्त परमबीर सिंग, पोलीस उपायुक्त (गुन्हे) पराग मणेरा आदी उपस्थित होते.

Web Title: The chest was 56 inches, Lalu secured the sequence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.