शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन विक्री विरोधात केमिस्टचा शुक्रवारी संप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 21:11 IST

औषधांची आॅनलाईन (ई फार्मसी) आणि पोर्टलच्या माध्यमातून होणाऱ्या विक्री विरोधात आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अँड ड्रगिस्टने (एआयओसीडी) शुक्रवारी (दि. १८) देशव्यापी संपाची हाक दिली आहे. 

ठळक मुद्देआॅनलाईन औषध विक्रीच्या धोरणाविरोधात केमिस्टच्या मनात अस्वस्थताजुन्या अथवा बनावट चिठ्ठीवर देखील औषधे देण्याचे प्रकार आॅनलाईन कंपन्या औषधांवर ५० ते ७० टक्के सवलत

पुणे : औषधांची आॅनलाईन (ई फार्मसी) आणि पोर्टलच्या माध्यमातून होणाऱ्या विक्री विरोधात आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अँड ड्रगिस्टने (एआयओसीडी) शुक्रवारी (दि. १८) देशव्यापी संपाची हाक दिली आहे. आॅनलाईन कंपन्या कायद्यात असलेल्या कोणत्याही जबाबदारीचे पालन न करताच औषधांची मागणी नोंदवित आहेत. गर्भपात किट (एमटीपी), सिल्डेनफिल, टॅडलफिल, कोडेन या सारखी गुंगी आणणारी औषधे देखील डॉक्टरांचा कोणताही सल्ला नसताना देण्यात येतात. काही औषधे स्त्री रोग अथवा मानसोपचार तज्ज्ञांच्या चिठ्ठीशिवाय देता येत नाहीत. अशी औषधे देखील आॅनलाईन उपलब्ध होत आहेत. जुन्या अथवा बनावट चिठ्ठीवर देखील औषधे देण्याचे प्रकार घडत आहेत. इतकेच काय तर अधिक कमिशनसाठी डॉक्टरांची बनावट ई चिठ्ठी तयार केली जाते.  अनेक आॅनलाईन औषध विक्री करणाऱ्या कंपन्या प्रिंट अथवा इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या माध्यमातून जाहिरात करतात. कायद्याच्या कलम १८ (क) नुसार वैध परवान्याशिवाय कोणत्याही औषधाची विक्री, वितरण, प्रदर्शन यावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. ई फार्मसी, पोर्टल्स अथवा इंटरनेटच्या माध्यमातून होणाऱ्या औषधांच्या बेकायदेशीर विक्रीच्या अनेक घटना केंद्रसरकार, संबंधित मंत्री आणि राज्य अन्न औषध प्रशासनाला दाखवून दिल्या आहेत. मात्र, त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.केंद्र सरकारने औषधांच्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांसाठी १६ टक्के आणि घाऊक व्यापाऱ्यांसाठी १० टक्के नफा मान्य केला आहे. आॅनलाईन कंपन्या औषधांवर ५० ते ७० टक्के सवलत देऊ करीत आहेत. त्यामुळे असमान स्पर्धा निर्माण होत आहे. म्हणूनच आॅनलाईन औषध विक्रीच्या धोरणाविरोधात केमिस्टच्या मनात अस्वस्थता पसरलेली असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. 

टॅग्स :PuneपुणेmedicineऔषधंCentral Governmentकेंद्र सरकारStrikeसंप