चेंबूरमध्ये पती-पत्नीची हत्या, एकाच खोलीत आढळले मृतदेह
By Admin | Updated: December 26, 2016 18:18 IST2016-12-26T18:18:36+5:302016-12-26T18:18:36+5:30
सहा महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या पती-पत्नीची हत्या झाल्याची घटना रविवारी चेंबूरच्या भाई-भाई नगरमध्ये घडली आहे

चेंबूरमध्ये पती-पत्नीची हत्या, एकाच खोलीत आढळले मृतदेह
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - सहा महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या पती-पत्नीची हत्या झाल्याची घटना रविवारी चेंबूरच्या भाई-भाई नगरमध्ये घडली आहे. गुलाम शेख (५०) आणि नसीमा बानो शेख (४०) असे मृत पती-पत्नीचे नाव असून, दोघांचाही हा दुसरा विवाह होता. दोघांच्याही शरीरावर मोठ्या प्रमाणात चाकूने वार करण्यात आले आहेत. याबाबत चेंबूर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.