लवकरच एटीएममधून वटवता येतील धनादेश
By Admin | Updated: June 20, 2014 23:37 IST2014-06-20T23:37:42+5:302014-06-20T23:37:42+5:30
धनादेश वटविण्यासाठी आता आठ-दहा दिवस वाट पाहण्याची गरज राहणार नाही.

लवकरच एटीएममधून वटवता येतील धनादेश
>वाशिम : धनादेश वटविण्यासाठी आता आठ-दहा दिवस वाट पाहण्याची गरज राहणार नाही. लवकरच हे काम ऑटोमेटेड टेलर मशीन (एटीएम)च्या साहाय्याने पार पडणार असल्यामुळे, धनादेशाद्वारे होणारे आर्थिक व्यवहार अधिक सुलभ होणार आहेत. एटीएममध्ये धनादेश टाकल्यावर काही वेळातच तो ‘क्लिअर’ होऊन रोख रक्कम अदा करणारी प्रणाली देशात विकसित करण्यात आली असून, लवकरच ती सुरू करण्यात येणार आहे.
अर्थ मंत्रलयाने एटीएमद्वारा धनादेश ‘क्लिअर’ करण्याच्या प्रणालीला अंतिम रुप दिले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक इत्यादी नामांकित बँकासह इतर बँकांमध्येही येत्या दोन वर्षात एटीएमद्वारा धनादेश ‘क्लिअर’ होणारी यंत्रणा सुरू होण्याची शक्यता आहे. हळूहळू ग्रामीण भागातही धनादेश ‘क्लिअर’ करणारे एटीएम सुरू होऊन, ग्रामीण व दुर्गम भागातही धनादेशाद्वारे होणा:या आर्थिक व्यवहारात वाढ होण्याची अपेक्षा आहे.
एटीएमद्वारा धनादेश ‘क्लिअर’ करणा:या प्रणालीचे प्रचलन विकसित देशात मागील दोन वर्षापासून सुरू झाले आहे. यामध्ये एटीएममध्ये धनादेश टाकल्यानंतर तो वाचणो, ग्राहकाच्या हस्ताक्षराची छाननी करणो, दुस:या व्यक्तीच्या खात्यातून धनादेश जमा करणा:या ग्राहकाच्या खात्यात पैसे जमा करणो आणि जमा रकमेतून मागणीप्रमाणो रोख रक्कम अदा करणो, ही सर्व प्रक्रिया एटीएम काही वेळातच पूर्ण करणार आहे. सध्या बँकेत धनादेश जमा केल्यानंतर, बाहेरगावचे धनादेश असल्यास ते ‘क्लिअर’ होण्यास काही दिवसांचा अवधी लागतो. धनादेश ‘क्लिअर’ होण्याची ग्राहकाला वाट पाहावी लागते आणि धनादेश वाट होण्यासाठी लागणारा खर्चही खातेदाराकडून वसूल केला जातो. स्थानिक बँकाच्या धनादेशाचेही ‘क्लिअरन्स’ बरेचदा एका दिवसात होत नाही. यामुळे वेळ व पैसा वाया जातो. देशातील सुमारे 4क् ते 5क् टक्के आर्थिक व्यवहार धनादेशाद्वारे होतात. (प्रतिनिधी)
धनादेशाद्वारा होणा:या व्यवहारास वेळ लागत असल्यामुळे बरेच नागरिक धनादेशाद्वारे आर्थिक व्यवहार करणो टाळतात; परंतु एटीएमद्वारे धनादेश स्वीकृत व रोख रकमेची अदायगी सुरू झाल्यावर धनादेशाद्वारे होणा:या व्यवहारात मोठय़ा प्रमाणात वाढ होऊ शकते.