चेकमेट दरोडा - ठाणे पोलिसांची रेकॉर्डब्रेक रिकव्हरी
By Admin | Updated: July 13, 2016 22:23 IST2016-07-13T22:23:49+5:302016-07-13T22:23:49+5:30
येथील चेकमेट सव्र्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवरील 11 कोटींचा दरोडा संपूर्ण राज्यातील लुटीचा एक उच्चांक ठरला. जसा लुटीचा उच्चंक ठरला, तसा ठाणो पोलिसांनीही वेगवान

चेकमेट दरोडा - ठाणे पोलिसांची रेकॉर्डब्रेक रिकव्हरी
- जितेंद्र कालेकर
ठाणे : येथील चेकमेट सव्र्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवरील 11 कोटींचा दरोडा संपूर्ण राज्यातील लुटीचा एक उच्चांक ठरला. जसा लुटीचा उच्चंक ठरला, तसा ठाणो पोलिसांनीही वेगवान हालचाली करून लुटारूंना रोकड खर्च करण्याची संधी न देताच 15 जणांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून आतार्पयत नऊ कोटी 75 लाखांची रेकॉर्डब्रेक रोकड मोठय़ा कौशल्याने वसूल केली आहे. आता दोन पथके नाशिक येथे पुन्हा गेली असून त्यांच्याकडून आणखी काही रकमेचा शोध लागण्याची शक्यता आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी एकदम 11 कोटींची रोकड लुटल्याची घटना यापूर्वी घडली नसल्याचे ठाण्यातील अनेक आजी माजी पोलीस अधिका:यांनी सांगितले. बदलापूर येथे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेतून चार महिन्यांपूर्वी 35 लाखांची लूट केली होती. ठाणो गुन्हे अन्वेषण विभागाने झारखंड येथून त्यातील नऊ दरोडेखोरांना अटक केली. त्यांच्याकडून 40 हजारांची रोकड हस्तगत केली. दोन वर्षापूर्वी नाशिक येथे एका गाडीतून जाणारे 16 कोटींचे 58 किलो सोने एका सशस्त्र टोळीने लुटले होते. त्यातील 10 पैकी पाच आरोपींना गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट पथकाने अटक केली. त्यांच्याकडून चार कोटींचे 13 किलो सोने हस्तगत केले आहे. 5 जुलै 1995 रोजी उल्हासनगर येथून घाटकोपरला बँकेची रोकड घेऊन जाणा:या व्हॅनमधून खारेगाव पुलाजवळ 65 लाखांची रोकड लुटण्यात आली होती. रबाळे पोलीस ठाण्याचे तत्कालीन उपनिरीक्षक किशोर पासलकर आणि राजेंद्र जाधव यांच्या पथकानेही त्या वेळी महागिरी, ठाणो तसेच नवी मुंबई, सांताक्रूझ आणि सायन भागातून आठ जणांना अटक केली होती. त्यांच्याकडूनही 51 लाखांची रोकड हस्तगत केली होती. अगदी अलीकडे चार महिन्यांपूर्वी डोंबिवलीच्या मानपाडा भागातून 51 लाखांची रोकड लुटण्यात आली. त्यातील आरोपी आणि रोकडही मिळाली नाही. तीन महिन्यांपूर्वी ठाण्याच्या कापूरबावडी भागातूनही बँकेत भरणा करण्यासाठी जाणा-यांकडून 25 लाखांची रोकड सशस्त्र टोळीने लुटली होती. कापूरबावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश जाधव यांच्या पथकाने त्यातील पाच जणांना अटक करून साडेपाच लाखांची रोकड हस्तगत केली होती.
ठाणे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आतार्पयत एकदम 11 कोटींची रोकड लुटीची घटना यापूर्वी घडलेली नसल्याचेच अनेक वरिष्ठ पोलीस अधिका:यांनी सांगितले. ठाण्यात 28 जून रोजी चेकमेटवर दरोडा पडल्यानंतर अवघ्या चारच दिवसांत गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर, पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ, सहायक पोलीस निरीक्षक रामभाऊ बनकर, शिवराज बेंद्रे, जमादार बाबू चव्हाण, रामदास शिंदे, हवालदार अशोक पवार आदींच्या पथकाने आकाश चव्हाण याच्यासह पाच जणांना तर नितेश चव्हाण याला खंडणीविरोधी पथकाने अटक केली. सुरुवातीला त्यांच्याकडून सात कोटींची रोकड हस्तगत केली. त्यानंतर, उर्वरित सहा जणांना नाशिक आणि ठाण्यातून अटक केली. आतार्पयत 11 कोटींपैकी नऊ कोटी 75 लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. आतार्पयत राज्यात रोकड लुटीतील दरोडय़ामधील ही एक रेकॉर्डब्रेक रिकव्हरी असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगतात.
आणखीही रोकड मिळणार
अटक केलेल्या किरण साळुंखे आणि त्याच्या साथीदारांनी दिलेल्या माहितीनुसार आणखीही काही रोकड नाशिकमधून मिळण्याची शक्यता आहे. ती शोधण्यासाठी युनिट-5 ची दोन पथके नाशिकला रवाना झाल्याची माहिती सूत्रंनी दिली. या दरोडय़ामध्ये आतार्पयत 15 जणांना अटक करण्यात आली असून त्यातील किरण साळुंखे या नाशिकच्या आरोपीकडून सर्वाधिक म्हणजे तीन कोटींची रोकड एकटय़ाकडून हस्तगत केली आहे.
नऊ जणांना न्यायालयीन कोठडी
या दरोडय़ातील आकाश चव्हाण, उमेश वाघ, दिनेश आव्हाड, मयूर कदम, हरिश्चंद्र मते, नवनाथ चव्हाण, पांडुरंग चव्हाण, मंदार उतेकर आणि योगेश चव्हाण आदींची पोलीस कोठडी 13 जुलै रोजी संपली. त्यांना ठाणो न्यायालयाने आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.