चेकमेट दरोडा : आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ
By Admin | Updated: July 18, 2016 23:17 IST2016-07-18T23:17:39+5:302016-07-18T23:17:39+5:30
चेकमेट सव्र्हिसेस या कंपनीतून 11 कोटींची लूट करणा:या 16 पैकी चौघांच्या पोलीस कोठडीत 20 जुलै रोजीर्पयत वाढ करण्याचे आदेश ठाण्याच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के.एल. गुप्ता यांनी दिले आहेत

चेकमेट दरोडा : आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ
ठाणे : चेकमेट सव्र्हिसेस या कंपनीतून 11 कोटींची लूट करणा:या 16 पैकी चौघांच्या पोलीस कोठडीत 20 जुलै रोजीर्पयत वाढ करण्याचे आदेश ठाण्याच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के.एल. गुप्ता यांनी दिले आहेत. यातील मीनानाथ चव्हाण या 16 व्या आरोपीकडून पाच लाख 79 हजारांची रोकड हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नाशिकमधून गेल्याच आठवडय़ात अटक केलेले हरिभाऊ वाघ, वैभव लहांमगे, लकी ऊर्फ लक्ष्मण गोवर्धने आणि भरुण ऊर्फ भास्कर संतोष शिंदे या चौघांच्या पोलीस कोठडीची मुदत 18 जुलैला संपली. त्यांना पुन्हा सोमवारी ठाणो न्यायालयात हजर करण्यात आले. या आरोपींकडून चेकमेट दरोडय़ातील आणखी रोकड मिळण्याची शक्यता असून त्यांच्याकडून आणखी चौकशी तसेच तपासासाठी त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिट-5 ने केली. पोलिसांच्या मागणीतील तथ्यता पडताळून न्यायालयाने चौघांच्या पोलीस कोठडीत वाढ केली.
मीनानाथ चव्हाण याच्या नाशिक येथील घराची झडती घेतली असता त्यात पाच लाख 79 हजारांची रोकड पोलीस निरीक्षक किशोर पासलकर, मदन बल्लाळ यांच्या पथकाने हस्तगत केली. आतार्पयत या दरोडय़ातील 1क् कोटी आठ लाखांची रोकड हस्तगत केल्याची माहिती सूत्रंनी दिली.