मृत न्यायाधीशाच्या साहित्याची तपासणी
By Admin | Updated: April 9, 2016 03:35 IST2016-04-09T03:35:50+5:302016-04-09T03:35:50+5:30
न्यायाधीश अनुप जवळकार यांच्या आत्महत्याप्रकरणी गुरुवारी रात्री चार न्यायाधीश व प्राधिकरण सदस्याविरुध्द चांदूररेल्वे पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते.

मृत न्यायाधीशाच्या साहित्याची तपासणी
चांदूररेल्वे /अमरावती : न्यायाधीश अनुप जवळकार यांच्या आत्महत्याप्रकरणी गुरुवारी रात्री चार न्यायाधीश व प्राधिकरण सदस्याविरुध्द चांदूररेल्वे पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणाचा तपास पोलीस अत्यंत गोपनीय पद्धतीने करीत असून सर्व तांत्रिक बाबींची चौकशी केल्यानंतरच आरोपींना अटक करण्यात येणार आहे.
पोलिसांनी मृत न्यायाधीश जवळकार यांचा लॅपटॉप व मोबाईल ताब्यात घेतला आहे. हा लॅपटॉप ‘फॉरेन्सिक लॅब’कडे पाठविण्यात येणार आहे. मोेबाईलचा ‘सीडीआर’ पोलिसांनी मागविला आहे. जवळकार यांनी मृत्यूपूवी स्वहस्ताक्षरात लिहिलेली चिठ्ठी त्यांचे बंधू अमोल यांना सापडली. यानंतरच या प्रकरणाचे गूढ उकलण्यास सुरूवात झाली. ‘लोकमत’ने हे प्रकरण लावून धरल्यामुळे तपासाला वेग आला. त्यानंतर पोलिसांनी चिठ्ठीतल्या चार न्यायाधीश व एका विधी प्राधिकरण सदस्याविरूध्द भादंविच्या कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हे नोंदविले. जवळकार यांचे घटनास्थळावरून बेपत्ता झालेले पाकीटसुध्दा या प्रकरणात महत्त्वपूर्ण पुरावा ठरू शकते. (प्रतिनिधी)