शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

फसवणूक करणाऱ्या बिल्डरच्या हाती बेड्या

By admin | Updated: July 4, 2016 04:50 IST

प्रत्यक्षात मूलभूत अटींची पूर्तता न करता ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या निगरगट्ट बांधकाम व्यावसायिकांवर आता कठोर कारवाई होणार आहे.

जमीर काझी,

मुंबई- फ्लॅट नोंदणी करताना भरमसाठ आश्वासने देऊन प्रत्यक्षात मूलभूत अटींची पूर्तता न करता ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या निगरगट्ट बांधकाम व्यावसायिकांवर आता कठोर कारवाई होणार आहे. मुदतीत ताबा न देणे, आवश्यक प्रमाणपत्रे उपलब्ध न करणे आदींबाबत त्याला आता तुरुंगवास भोगावा लागणार आहे.महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अ‍ॅक्ट(मोफा) व महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना (एमआरटीपी) अंतर्गत फसवणुकीबाबत दखलपात्र गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दिले आहेत. घर खरेदीत नागरिकांच्या फसवणुकीची वाढती प्रकरणे व अनधिकृत बांधकामांमुळे राज्यातील सर्व आयुक्त व अधीक्षकांनी आपल्या अखत्यारीतील प्रभारी अधिकाऱ्यांना याबाबतच्या तक्रारीवर काटेकोर अंमलबजावणीच्या सूचना केल्या आहेत. राज्य सरकारने बिल्डरकडून होणाऱ्या फसवणुकीला लगाम घालण्यासाठी महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स, रेग्युलेशन आॅफ प्रमोशन आॅफ कन्स्ट्रक्शन, सेल मॅनेजमेंट अ‍ॅक्ट १९६५ तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना कायदा केला आहे. मात्र तरीही त्यातील पळवाटांचा लाभ बिल्डर घेतात आणि कारवाईपासून दूर राहतात. त्यामुळे या नियमावलीतील सर्व तक्रारी या दखलपात्र गुन्ह्यात नोंदविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणेच शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. >दखलपात्र तक्रारीचे स्वरूपफ्लॅटचा ताबा मुदतीत न देणे, ताबा देण्यापूर्वी भोगवटा प्रमाणपत्र न देणे, ठरलेल्या रकमेच्या २० टक्केरक्कम देऊनही लेखी करार न करणे, पालिकेने मंजूर केलेले नकाशे साईटवर प्रदर्शित न करणे शिक्षेचे स्वरूप : गुन्हा सिद्ध झालेल्यांना गुन्ह्याच्या स्वरूपानुसार ५, ३ व १ वर्षाची शिक्षा होऊ शकते.‘नागरिकांनी पुढे यावे’बिल्डराकडून फसवणुकीच्या घटना वाढत असल्याने त्याबाबत योग्य कायदेशीर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी न घाबरता तक्रारी कराव्यात. - प्रवीण दीक्षित, पोलीस महासंचालक