नाशिककरांची फसवणूक
By Admin | Updated: January 14, 2015 03:53 IST2015-01-14T03:53:05+5:302015-01-14T03:53:05+5:30
केबीसी, विकल्पपाठोपाठ आता ओडिशातील मायक्रो फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने पैशांचे आमिष दाखवून येथील गुंतवणूकदारांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे़

नाशिककरांची फसवणूक
नाशिक : केबीसी, विकल्पपाठोपाठ आता ओडिशातील मायक्रो फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने पैशांचे आमिष दाखवून येथील गुंतवणूकदारांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे़
फसवणूक झालेल्या गुंतवणूकदार व ठेवीदारांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून भद्रकाली पोलीस ठाण्यात यासंदर्भात निवेदन दिले. विशेष म्हणजे या कंपनीने देशभरातील विविध शाखांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली असून, रिझर्व्ह बँक आॅफ इंडियान
े जुलै २०१४ मध्ये कंपनीचा परवाना
रद्द केला आहे़ भद्रकालीतील कॉम्प्लेक्समध्ये तीन वर्षांपासून कंपनीचे कार्यालय होते़ मात्र येथील कार्यालय महिनाभरापासून बंद असल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत़ (प्रतिनिधी)