अभिनेता मनोज तिवारीच्या नावाने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2016 04:53 IST2016-07-25T04:53:42+5:302016-07-25T04:53:42+5:30

एका महिला गीतकाराला भोजपुरी अभिनेते आणि गायक मनोज तिवारी यांच्या नावाने लाखोंचा गंडा घालण्यात आला आहे. मालाड येथे ही घटना घडली असून, या महिलेने या प्रकरणी बांगुरनगर

Cheating by the name of actor Manoj Tiwari | अभिनेता मनोज तिवारीच्या नावाने फसवणूक

अभिनेता मनोज तिवारीच्या नावाने फसवणूक

मुंबई : एका महिला गीतकाराला भोजपुरी अभिनेते आणि गायक मनोज तिवारी यांच्या नावाने लाखोंचा गंडा घालण्यात आला आहे. मालाड येथे ही घटना घडली असून, या महिलेने या प्रकरणी बांगुरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी प्रदीपलाल यादव याला अटक केली आहे.
यादव याने सिन्हा यांना मनोज तिवारी यांच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली होती. तसेच तिवारी यांच्या आवाजात फोनही केल्याने त्या भारावून गेल्या. शिवाय तिवारी यांच्या नावाने यादव याने सिन्हांकडे गाण्यांची मागणी केली. तेव्हा त्यांनी स्वत: लिहिलेली पन्नास गाणी यादवला पाठवली. मात्र त्यानंतर या गीतांबाबत त्यांनी प्रत्यक्षात मनोज तिवारी यांच्याकडे विचारणा केली असता आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर यादव याला हरियाणातून अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Cheating by the name of actor Manoj Tiwari