शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

विरोधकांच्या जिल्हा बँकांकडून फसवणूक, सहकारमंत्र्यांचा विधानसभेत हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 05:47 IST

कर्जमाफीसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी दिलेली शेतकऱ्यांची यादी आणि शेतकºयांनी कर्जमाफीसाठी केलेल्या अर्जांची संख्या यात प्रचंड तफावत होती. कर्जमाफीबाबत महाराष्ट्राची फसवणूक करण्याचे काम कोणी केले याचे उत्तर द्या, असा हल्लाबोल

विशेष प्रतिनिधीनागपूर : कर्जमाफीसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी दिलेली शेतकऱ्यांची यादी आणि शेतकºयांनी कर्जमाफीसाठी केलेल्या अर्जांची संख्या यात प्रचंड तफावत होती. कर्जमाफीबाबत महाराष्ट्राची फसवणूक करण्याचे काम कोणी केले याचे उत्तर द्या, असा हल्लाबोल सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मंगळवारी विधानसभेत विरोधकांवर केला.विरोधकांच्या प्रस्तावावरील उत्तर देताना आक्रमक झालेले देशमुख म्हणाले की, कुठे काय गडबड झाली अन् ती कुणी केली हे राज्याला कळलेच पाहिजे.कर्जमाफीच्या नावावर जिल्हा बँकांनी दिशाभूल केल्याची आकडेवारीच सभागृहात त्यांनी सादर केली. कर्जमाफीच्या नावाखाली भलत्यांचीच पोटं भरली जाऊ नयेत, म्हणून सरकार सतर्क होते. आम्ही आॅनलाइन अर्ज अनिवार्य करून सरकारचे ९७८ कोटी रुपये वाचविले, असे ते म्हणाले.मी कोणत्या पक्षाची कोणती बँक आहे, तिथे कोण संचालक आहेत अशी नावे घेणार नाही, असे सांगताना त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या जिल्हा बँकांची उदाहरणे दिली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अहमदनगरजिल्हा बँकेने ३ लाख १९हजार शेतकºयांची यादी कर्जमाफीसाठी दिली होती. प्रत्यक्षात २ लाख ५२ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज केले.नाशिक जिल्हा बँकेने ३ लाख १९ हजार शेतकºयांची यादी दिली, पण प्रत्यक्षात १ लाख ९० हजार अर्ज आले. कोल्हापूर जिल्हा बँकेबाबतही तसेच घडले. बड्या संस्थांकडे जिल्हा बँकांची मोठी थकबाकी आहे; पण गरीब शेतकºयांना देण्यासाठी या बँकांकडे पैसा नाही.आधीच्या कर्जमाफीचे वाभाडे- आघाडी सरकारच्या काळात तब्बल ६ लाख २ हजार अपात्र शेतकºयांना कर्जमाफी देण्यात आली. कॅगच्या अहवालात हा सगळा भोंगळ कारभार आलेला आहे, असे ते म्हणाले. ४.२५ लाख शेतकºयांना कमी कर्ज देऊन त्यांच्या नावावर अधिक रक्कम दाखविण्यात आली.- अमरावती जिल्हा बँकेला कर्जमाफीचा छदामही मिळाला नाही, या वीरेंद्र जगताप (काँग्रेस) यांच्या आरोपाला उत्तर देताना देशमुख म्हणाले की, काहीही खोटे सांगू नका. राज्य सरकारने तब्बल २९२ कोटी रुपये कर्जमाफीसाठी तिथे दिले आहेत. तसेच २५० कोटी रुपयांचे फेरकर्ज मंजूर केले आहे. शेवटच्या लाभार्थी शेतकºयाला कर्जमाफी मिळत नाही तोवर कर्जमाफीची योजना थांबणार नाही.वर्धेच्या बापूराव देशमुख सूतगिरणीने तेथील जिल्हा बँकेचे २० कोटी रुपये थकविले आहेत. निफाड सहकारी साखर कारखान्याने नाशिक जिल्हा बँकेचे १४७ कोटी ४८ लाख रुपये तर मुंगसाजी कारखान्याने बुलडाणा जिल्हा बँकेचे ४१ कोटी तर आर्यन शुगरने सोलापूर बँकेचे १९३ कोटी तर शिवराज कारखान्याने १५९ कोटी व सांगोला साखर कारखान्याने ८१.४८ कोटी रुपये थकविले आहेत.राष्ट्रीयीकृत बँकाही लक्ष्यराष्ट्रीयीकृत बँकांना लक्ष्य करताना देशमुख म्हणाले की, स्टेट बँकेने कर्जमाफीच्या १३ लाख लाभार्र्थींची यादी दिली होती, पण प्रत्यक्ष आॅनलाईन अर्ज हे १० लाखच आले. बँक आॅफ इंडियाने ३.९७ लाख शेतकºयांची यादी दिली; पण आॅनलाईनमध्ये २.६२ लाख शेतकरीच असल्याचे स्पष्ट झाले.

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुखMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार