फसवणूक करणाऱ्या बिल्डरला अटक
By Admin | Updated: June 8, 2016 02:00 IST2016-06-08T02:00:57+5:302016-06-08T02:00:57+5:30
तालुक्यातील शेकडो ग्राहकांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या शरद मोझर, प्रेमनाथ यादव व रमेश जेधे यांना खांदेश्वर पोलिसांनी अटक केली आहे

फसवणूक करणाऱ्या बिल्डरला अटक
पनवेल : तालुक्यातील शेकडो ग्राहकांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या शरद मोझर, प्रेमनाथ यादव व रमेश जेधे यांना खांदेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना १0 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तालुक्यातील विहिघर येथे स्वस्तात घर बांधून देतो असे सांगून शरद मोझर या बांधकाम व्यावसायिकाने नवीन पनवेल येथे स्वप्नपूर्ती होम्स नामक कार्यालय थाटले होते. जाहिराती करून ग्राहकांकडून कोट्यवधी रुपये घेण्यात आले. मात्र विहिघर, नेरेपाडा, नेरे व इतर साईटवर रूम देतो असे सांगून दोन वर्षे कोणतेही बांधकाम न करता स्वप्नपूर्ती बिल्डरने रुमचा ताबा ग्राहकांना दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ग्राहकांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात बांधकाम व्यावसायिकाविरोधात तक्र ार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून शरद मोझर, प्रेमनाथ यादव व रमेश जेधे यांना अटक केली आहे. (वार्ताहर)
>सहा गुन्हे दाखल
न्यायालयात हजर केले असता त्यांना १0 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शरद मोझरवर फसवणुकीचे एकूण सहा गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांनी दिली.