चव्हाणच्या लॉकरमध्ये सव्वापाच किलो सोने

By Admin | Updated: May 17, 2016 06:14 IST2016-05-17T06:14:55+5:302016-05-17T06:14:55+5:30

केबीसीचा प्रमुख सूत्रधार भाऊसाहेब व आरती चव्हाण यांच्या बँकेतील सहाव्या लॉकरमध्ये सोमवारी एक कोटी ५९ लाख रुपये किमतीचे पाच किलो ३०० ग्रॅम वजनाचे सोने आढळून आले़

Chawhan's locker is about three pounds of gold | चव्हाणच्या लॉकरमध्ये सव्वापाच किलो सोने

चव्हाणच्या लॉकरमध्ये सव्वापाच किलो सोने


नाशिक : राज्यभरातील गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेले केबीसीचा प्रमुख सूत्रधार भाऊसाहेब व आरती चव्हाण यांच्या बँकेतील सहाव्या लॉकरमध्ये सोमवारी एक कोटी ५९ लाख रुपये किमतीचे पाच किलो ३०० ग्रॅम वजनाचे सोने आढळून आले़
आर्थिक गुन्हे शाखेने चव्हाण दाम्पत्याच्या लॉकरमधून आतापर्यंत १३ किलो ९६५ ग्रॅम सोने व २ किलो ३०० ग्रॅम चांदी असा ऐवज जप्त केला आहे़ केबीसी मल्टिट्रेड अ‍ॅण्ड रिसोर्ट प्रायव्हेट लिमिटेडचा प्रमुख सूत्रधार भाऊसाहेब व आरती चव्हाण यांनी गुंतवणूकदारांना तिप्पट रकमेचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये जमा केले़ मात्र गुंतवणूकदारांना परतावा न देता त्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. गुन्हा नोंदवल्यानंतर सिंगापुरला फरार झालेल्या चव्हाण दाम्पत्यास मुंबई विमानतळावरून अटक झाली़ आतापर्यंत केबीसीची ८० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती़

Web Title: Chawhan's locker is about three pounds of gold