परीक्षा नियंत्रक चव्हाण यांची गच्छंती अटळ
By Admin | Updated: July 26, 2014 01:16 IST2014-07-26T01:16:59+5:302014-07-26T01:16:59+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांची गच्छंती अटळ आहे.

परीक्षा नियंत्रक चव्हाण यांची गच्छंती अटळ
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांची गच्छंती अटळ आहे. त्यांना परीक्षा नियंत्रक पदावरून तडकाफडकी कार्यमुक्त करून सक्षम व्यक्तीकडे त्यांचा तात्पुरता पदभार देण्याचा धाडसी निर्णय गुरुवारी व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे.
दरम्यान, ‘लोकमत’ने स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून चव्हाटय़ावर आणलेला पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयातील ‘कॅस सेंटर’मधील उत्तरपत्रिका तपासणी घोटाळाही परीक्षा नियंत्रक डॉ. चव्हाण
यांच्या कार्यमुक्तीस कारणीभूत ठरला आहे.
विद्यापीठाला नॅकचा ‘अ’ दर्जा मिळाल्यानंतरही हे विद्यापीठ सतत परीक्षा विभागातील विविध कारनाम्यांमुळे चर्चेत असते. कधी पेपरफुटी प्रकरण, तर कधी ‘कॅस’ सेंटरमध्ये उत्तरपत्रिका तपासणीचे घोटाळे. परीक्षा विभागातील अनियमिततेस सर्वस्व परीक्षा नियंत्रक डॉ. चव्हाण हेच जबाबदार आहेत. त्यांचे परीक्षा विभागावर नियंत्रण नाही. या विभागात अनेक वर्षापासून काही कर्मचा:यांनी बस्तान मांडलेले आहे. तेही तेथे होणा:या अनियमिततेस जबाबदार आहेत, असे आरोप व्यवस्थापन समितीच्या बैठकीत 5-6 सदस्यांनी केले.
विषयाचे गांभिर्य लक्षात घेऊन समितीने ठराव केला की, परीक्षा नियंत्रक म्हणून कार्यरत असलेले डॉ. चव्हाण यांची तडकाफडकी त्यांच्या मूळ आस्थापनेवर बदली करण्यात येईल. (प्रतिनिधी)
चौकशी समितीची स्थापना
च्परीक्षा विभागात झालेले अनेक घोटाळे चव्हाटय़ावर आले आहेत. प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची छपाई, पेपरची हेराफेरी, उत्तरपत्रिका तपासणीच्या कामातील अनियमितता व अन्य बाबींची चौकशी करण्यासाठी प्राचार्य डॉ. दत्तात्रय आघाव यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली.