नाव वगळण्यासाठी चव्हाण पुन्हा कोर्टात
By Admin | Updated: December 20, 2014 03:16 IST2014-12-20T03:16:57+5:302014-12-20T03:16:57+5:30
आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळ्यातून नाव वगळण्यास नकार देण्याच्या निकालाचा न्यायालयाने पुनर्विचार करावा, अशी विनंती करणारी याचिका

नाव वगळण्यासाठी चव्हाण पुन्हा कोर्टात
मुंबई: आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळ्यातून नाव वगळण्यास नकार देण्याच्या निकालाचा न्यायालयाने पुनर्विचार करावा, अशी विनंती करणारी याचिका माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण यांनी उच्च न्यायालयात केली आहे़
गुरूवारी या याचिकेवर न्या़ साधना जाधव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली़ मात्र हा मुळ निकाल न्या़ एम़एल़ ताहिलयानी यांनी दिला असल्याने यावर माझ्यासमोर सुनावणी होऊ शकत नसल्याचे न्या़ जाधव यांनी स्पष्ट केले़ त्यामुळे शुक्रवारी मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्या खंडपीठाकडे या याचिकेचे लक्ष वेधण्यात आले़ त्याची नोंद करून घेत या याचिकेवर संबंधित न्यायधीशांसमोर सुनावणी होईल, असे मुख्य न्यायाधीश शहा यांनी जाहीर केले़
या घोटाळ्यात चव्हाण हे आरोपी आहेत़ पदाचा गैर वापर करून या सोसायटीला विविध परवानग्या दिल्याचा चव्हाण यांच्यावर आरोप आहे़ याप्रकरणी खटला चालवण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती करणारा अर्ज सीबीआयने राज्यपाल यांच्याकडे केला होता़ राज्यपाल यांनी ही परवानगी नाकारली़ अखेर या खटल्यातून नाव वगळण्यासाठी आधी सीबीआयने विशेष न्यायालयात अर्ज केला़ विशेष न्यायालयाने सीबीआयचा अर्ज फेटाळल्यानंतर या तपास यंत्रणेने उच्च न्यायालयात धाव घेतली़ (प्रतिनिधी)