चौधरी हत्येतील चौकडीला पोलीस कोठडी

By Admin | Updated: May 13, 2017 02:23 IST2017-05-13T02:23:29+5:302017-05-13T02:23:29+5:30

घरदुरुस्तीच्या वादातून ठाकुर्लीत मंगळवारी झालेल्या बेछूट गोळीबार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी

Chaudhari murder quarreled with police cell | चौधरी हत्येतील चौकडीला पोलीस कोठडी

चौधरी हत्येतील चौकडीला पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : घरदुरुस्तीच्या वादातून ठाकुर्लीत मंगळवारी झालेल्या बेछूट गोळीबार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दिलीप भोईर, शंकर भोईर, सूरज भोईर आणि चिराग उर्फ सागर भोईर यांना शुक्रवारी कल्याण न्यायालयाने १९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंग पवार यांनी ‘लोकमत’ला दिली.
दिलीप, शंकर, सूरज आणि चिराग यांना कोळेगावातून, तर परेश व कुणाल आंधळे यांना पोलिसांनी गुरुवारी मालेगाव येथून अटक केली होती. या चारही जणांना शुक्रवारी कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना १९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी कुणाल व परेश आंधळे यांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपहृत महिमादास विल्सन यांचा शोध सुरू असल्याची माहितीही पवार यांनी दिली.

Web Title: Chaudhari murder quarreled with police cell