‘लव्ह यू’ म्हणत पाठलाग करणारा रोमियो तुरुंगात
By Admin | Updated: October 31, 2014 01:50 IST2014-10-31T01:50:47+5:302014-10-31T01:50:47+5:30
अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून त्यांना आय लव्ह यू म्हणणा:या 21 वर्षीय युवकाला येथील न्यायालयाने 1क् महिने 1क् दिवसांचा सश्रम कारावास व 5क्क् रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

‘लव्ह यू’ म्हणत पाठलाग करणारा रोमियो तुरुंगात
वरोरा : अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून त्यांना आय लव्ह यू म्हणणा:या 21 वर्षीय युवकाला येथील न्यायालयाने 10 महिने 10 दिवसांचा सश्रम कारावास व 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. भद्रावती तालुक्यातील सुमठाणा येथील एका अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी दाखल केलेल्या खटल्यात वरोरा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.
भद्रावती पोलीस ठाण्याअंतर्गत येणा:या सुमठाणा येथील काही अल्पवयीन मुली परिसरातील दुकानात गेल्या. दुकानातून परत येताना त्याच गावात राहणा:या भारत दिलीप बोबडे (21) या युवकाने या मुलींना ‘आय लव्ह यू’ म्हणत त्यांचा पाठलाग केला. घरी परतल्यानंतरही भारतने या मुलींचा पिच्छा सोडला नाही. तो नेहमीच त्यांचा पाठलाग करीत असे. ‘आय लव्ह यू’, ‘मी तुङयावर प्रेम करतो’, ‘मी तुङयाशिवाय राहू शकत नाही’, ‘मी तुङयासाठी जीव देऊ शकतो’, असे म्हणत तो मुलींना सतत त्रस देत असे. त्यामुळे या त्रसाला कंटाळलेल्या एका अल्पवयीन मुलीने भारत बोबडे याच्याविरुद्ध 17 डिसेंबर 2क्13 रोजी भद्रावती पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत भारतविरुद्ध बालक लैंगिक अत्याचार अधिनियम 2क्12 नुसार गुन्हा दाखल केला.
या प्रकरणाचा तपास वरो:याचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी गणोश गावडे यांनी केला. त्यानंतर वरोरा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकारी वकील जयंत ठाकरे यांनी दहा जणांच्या साक्षी नोंदविल्या. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश ई.एन. काझी यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर भारत बोबडे याला 1क् महिने दहा दिवस सश्रम कारावास व 5क्क् रुपये दंडाची शिक्षा सुनावली. (प्रतिनिधी)
या युवकाने या मुलींना ‘आय लव्ह यू’ म्हणत त्यांचा पाठलाग केला. घरी परतल्यानंतरही भारतने या मुलींचा पिच्छा सोडला नाही. त्यामुळे या त्रसाला कंटाळलेल्या एका अल्पवयीन मुलीने त्याच्याविरोधात तक्रार केली.