मुख्यमंत्र्यांच्या सभेत मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी, चार जणांना अटक
By Admin | Updated: February 12, 2017 18:20 IST2017-02-12T18:20:01+5:302017-02-12T18:20:01+5:30
नांदेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या घोषणा दिल्या.

मुख्यमंत्र्यांच्या सभेत मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी, चार जणांना अटक
ऑनलाइन लोकमत
नांदेड, दि. 12 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नांदेड जिल्ह्यातील नरसी येथे सुरु असलेल्या सभेत छावा कार्यकर्त्यांनी आरक्षणच्या घोषणा दिल्या. पोलिसांनी लगेच चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भाषण पुढे सुरु केले.
नांदेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या घोषणा दिल्या. यावर तुम्ही फोटो काढून तुमचं काम पूर्ण करुन घ्या, अशा शब्दात घोषणा देणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. मराठा समाजाला आरक्षण फक्त भाजप सरकारच देऊ शकेल, असंही सांगायला मुख्यमंत्री विसरले नाहीत.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारासाठी नांदेड जिल्ह्यातील नरसी इथे मुख्यमंत्र्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.